…या वादातून महिलेने लहान मुलासह घेतली टॉवरवरून उडी

…या वादातून महिलेने लहान मुलासह घेतली टॉवरवरून उडी

अवघ्या साडेतीन वर्षाच्या बाळाला छातीशी कवटाळून आईने उंच टॉवरवरून उडी मारून जीवनप्रवास संपवल्याची दुर्दैवी घटना चुनाभट्टी परिसरात घडली आहे. या मायलेकाचे मृतदेह नाल्यात सापडले आहेत. ही घटना मुंबईतील चुनाभट्टी परिसरात उघडकीस आली आहे.

चुलत दिरासोबत असलेल्या संपत्तीच्या वादातून एका महिलेने तिच्या लहान बाळाला घेऊन आत्महत्या केली आहे.

श्रुती महाडिक (३६) या कुर्ला येथील कामगार नगरमध्ये मुलगा राजवीर (३.५) पती यशराज, सासरे, चुलत दीर सचिन महाडिक आणि त्याच्या कुटुंबासोबत ड्युप्लेक्समध्ये राहत होती. श्रुती ही गृहिणी होती आणि तिचा पती यशराज याचे किराणा मालाचे दुकान आहे.

नेहरूनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जानेवारीला श्रुती घरातून राजवीरला घेऊन निघून गेली. तिने जाताना तिच्या आईला फोन करून मुलासह आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. जाताना तिने एक सुसाईड नोट लिहिली. ज्यात चुलत दिराच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे तिने लिहिले आहे.

श्रुतीच्या आईने याबाबत तिच्या पतीला माहिती दिली. दिवसभर वाट पाहून अखेर त्यांनी रात्री नेहरूनगर पोलिसांना सुसाईड नोट दाखवत तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याची नोंद घेत तिला शोधण्यास सुरुवात केली. सतत दोन दिवस श्रुती महाडिक आणि तिच्या मुलाचा शोध नेहरूनगर पोलिसांनी घेतल्यानंतरही ते कुठेच सापडले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. आणि एका कॅमेऱ्यात नाल्याचे पाणी काही क्षणासाठी वर उडताना दिसल्यावर पोलिसांना याबाबत शंका आली. लोकेशनची मदत घेत त्यांनी त्या नाल्याच्या गाळ उपसला आणि त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढले.

हे ही वाचा:

१६ जानेवारी आता ” राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस ”

महेश मांजरेकर म्हणतात, …कोन नाय कोन्चा, चित्रपट १८ वर्षांवरील प्रेक्षकांसाठीच!

मुंबई महापालिकेत जाधव, चहल, वेलारसु यांची ‘वाझेगिरी

२४ तासात देशात अडीच लाख कोरोना रुग्ण

 

ज्या टॉवरवरून तिने उडी मारली त्या टॉवरच्या कम्पाउंडला लागून एक नाला आहे आणि त्याच्या पलीकडे २० ते २५ फुटांचा एक डोंगर आहे. याच फटीत दोन ते तीन फूट आत हे दोघे पडले होते. पोलिसांनी तिचा दीर सचिनला ताब्यात घेतले असून, सर्वांचे जबाब पोलीस नोंदवत आहेत.

Exit mobile version