नाशिक हादरले! महिलेची दुचाकी अडवून बलात्कार

नाशिक हादरले! महिलेची दुचाकी अडवून बलात्कार

कानाकोपऱ्यातून समोर येणाऱ्या बलात्काराच्या घटनांनी राज्य सुन्न झाले आहे. अशातच महाराष्ट्रात नाशिकमधून बलात्काराचे आणखीन एक धक्कादायक प्रकरण पुढे आले आहे. दुचाकीवरुन जाणाऱ्या एका महिलेची गाडी अडवून तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना नाशिकमध्ये घडली आहे. यावेळी त्या पीडित महिलेचे अश्लील फोटोही काढण्यात आले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्या मधील शहा शिवार येथे ही घटना घडली आहे. पीडित महिला आपल्या दुचाकीवरून चालली होती. पंचाळे-कोळपे या रस्त्यावरून जात असतानाच आरोपीने आपल्या चार चाकी गाडीने तिचा पाठलाग सुरू केला. ही बाब लक्षात येताच महिलेने आपल्या गाडीचा वेग वाढवला. पण त्याचा उपयोग झाला नाही. पुढे भररस्त्यात तिची गाडी अडवली गेली. अत्याचार करणाऱ्या नराधमाने आपली चार चाकी गाडी दुचाकीच्या समोर आडवी टाकून महिलेला थांबवले. त्यानंतर महिलेवर जबरदस्ती करत तिला कारमध्ये कोंबले गेले. गाडीचे दरवाजे आणि खिडक्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या या महिलेचा आवाज कोणीही ऐकू शकले नाही. त्या महिलेवर बलात्कार करण्यात आला. ती महिला प्रतिकार करून आपली अब्रू वाचवण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला यश आले नाही.

हे ही वाचा:

बाप रे! मुंबईत ७ महिन्यांत घडले ५५० बलात्काराचे गुन्हे

ठाकरे सरकार बेजबाबदार आणि असंवेदनशील! महिला आयोगाचे ताशेरे

रोहित शर्मा होणार भारतीय संघाचा कर्णधार?

मेडवेडेवने जिंकले ‘अमेरिकन ड्रीम’! जोकोविचचे ऐतिहासिक स्वप्न भंगले

आरोपी तेवढ्यावरच थांबला नसून पुढे त्याने या महिलेचे अश्लील फोटो काढले आणि या घटनेची वाच्यता केल्यास हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. पण या दाम्पत्यांनी न डगमगता पीडितेने वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रशांत राजाराम सांगळे असे या संशयित मुख्य आरोपीचे नाव असून तो सिन्नर तालुक्यातील रहिवासी आहे. सध्या वावी पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

Exit mobile version