महाड तालुक्यात एका महिलेने तिच्या सहा मुलांना विहीरीमध्ये ढकलून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत सहाही मुलांचा मृत्यू झाला आहे तर महिलेचा जीव वाचला आहे. पाच मुली आणि एका मुलाचा मृत्यू या घटनेत झाला आहे. या मुलांचे वय १८ महिने ते १० वर्षे या वयोगटातील होते.
महाड येथील खरवली गावात ही महिला पती आणि सहा मुलांसह राहत होती. पती सतत दारु पिऊन त्रास देत असल्यामुळे कंटाळेल्या या महिलेले हे धक्कादायक पाऊल उचलले. सोमवार, ३० मे रोजी या महिलेने पाच मुली आणि एका मुलाला आधी विहिरीत ढकलून दिले आणि त्यांनतर तिने देखील उडी मारली. मात्र, याचवेळी जवळच्या आदिवासी महिलांनी तिला पाहिले आणि तिचा जीव वाचला. त्यानंतर गावात येऊन तिने हकीकत सांगितल्यावर सगळ्यांना धक्का बसला. मात्र, तोपर्यंत सहा मुलांचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा:
माजी मंत्र्यांच्या घरात घुसून मागितली खंडणी
मरिन लाईन्स समुद्रात इसमाची आत्महत्या
आव्हाडांसाठी पोलिसाने कारचालकाला लगावली थप्पड
या प्रकरणात महिलेचा जीव वाचला असला, तरी सहा लहान मुलांचा नाहक जीव गेला आहे. हे कुटूंब परराज्यातील असून ते येथे उदरनिर्वाह करण्यासाठी आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे महाडमध्ये खळबळ उडाली आहे. महाड एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.