महिला पोलिस अधिकाऱ्याला हवी तुपातली बिर्याणी! तीही फुकट

महिला पोलिस अधिकाऱ्याला हवी तुपातली बिर्याणी! तीही फुकट

पुण्यात एका महिला पोलिस अधिकाऱ्याची आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा संवादाची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. या महिला आधिकाऱ्याला एसपीजची साजूक तुपातील बिर्याणी हवी असल्याचे ऐकू येते. पण तीही फुकटात’. याचा ऑडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

गेल्या वर्ष दीड वर्षात पोलिसांवर विविध प्रकारच्या झालेल्या आरोपांमुळे पोलिस दलाची प्रतिमा डागाळल्याचे बोलले जात असताना त्यात आता या ऑडिओ क्लिपची भर पडली आहे. या ऑडिओ क्लिपमुळे पोलिस देखील हॉटेलकडून वसूली करतायेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या ऑडिओ क्लिपमधील महिला पोलिस अधिकारी कोणतेही पैसे न देता मटन बिर्याणी, कोळंबी, बोंबीलची ऑर्डर देत असल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. फुकट बिर्याणी मागणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या ऑडिओ क्लिपमुळे संबधित पोलिसांवरच प्रश्न निर्माण झाला आहे.

या ऑडिओ क्लिपमधील महिला पोलिस अधिकारी, ”विश्रामबागच्या हद्दीत नॉनव्हेज खूप चांगलं कुठे मिळते” असे विचारत आहे. त्यावर, ”एसपीजची साजूक तुपातील बिर्याणी आणि कोल्हापूरची मटण थाळी चांगली मिळते. असे फोनवरील पोलिस कर्मचारी सांगतो. त्यानंतर, ”बिर्याणी घरी पाठवून द्या आणि हिशोबाचे काही असेल तर स्थानिक पीआयला सांगा” असे महिला पोलिस अधिकारी त्या पोलिस कर्मचाऱ्याला सांगते. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याने ”आपण आधी असे कधी केले नाही. आपण कॅश देतो” असे सांगितल्यावर, संबधित महिला पोलिस अधिकारी, ”आपल्या हद्दीमध्ये आपण का पैसे द्यायचे” असे उत्तर देत आहे. त्यांनतरही संबधित महिला पोलिस अधिकारी, कोळंबी आणि बोंबील कुठे मिळेल, अशी विचारणा करत आहे.

हे ही वाचा:
मुलं जन्माला घाला आणि पैसे घ्या योजना

फडणवीस-ठाकरे भेट का झाली? कुठे झाली?

छत्रपती शिवरायांना आदर्श मानणाऱ्या योद्ध्यावर नवी वेब सिरिज

सीबीएसईचा बारावीचा निकाल आज, काय असणार वेळ?

दरम्यान, याबाबत महिला पोलिसांसोबत संवाद साधला असता तिने आपल्या म्हणण्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे.  ”हा कॉल ७-८ महिन्यांपूर्वीचा आहे. माझे असे मत नव्हतं. माझ्याविरोधात जाणूनबुजून कोणतरी हे केले आहे, असे स्पष्टीकरण या महिलेने दिले आहे.

व्हीडिओ जुना असला तरी असे एका पोलिस अधिकाऱ्याने करणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. या महिला पोलिस अधिकारी आयपीएस आहेत तर त्यांचे पती आयएएस आहेत, असे कळते.

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी या प्रकरणाची चौकशी होईल आणि मग काय कारवाई करायची ते ठरविता येईल, असे म्हटले आहे.

Exit mobile version