तेलंगणामध्ये एका महिलेने ८ कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून आपल्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, महिलेने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तब्बल ८०० किलोमीटरचा प्रवास केला. या प्रकरणी मृत व्यक्ती रमेशची पत्नी निहारिका, तिचा प्रियकर निखिल साथीदार अंकुरला अटक करण्यात आली आहे.
८ ऑक्टोबर रोजी, कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यातील एका कॉफीच्या मळ्यात पोलिसांना एक जळालेला मृतदेह सापडला होता. पीडितेची ओळख सुरुवातीला अज्ञात होती आणि तपास सुरु केला. प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी एक लाल रंगाची कार पोलिसांच्या निदर्शनास आली अधिक तपासात ही कार रमेशच्या नावावर असून, त्याच्या पत्नीने हरवल्याची फिर्याद दिल्याचे दिसून आले.
हे ही वाचा :
MUDA मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कर्नाटकमध्ये सहापेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी
पोलिसांनी कारवाई करताच केली मारहाण
शरद पवारांची चौथी यादी; अनिल देशमुखांऐवजी त्यांच्या मुलाला उमेदवारी
बोरिवलीतून संजय उपाध्याय, वसईतून स्नेहा दुबे, तर सावनेरमधून आशिष देशमुख!
पोलिसांनी तेलंगणा पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणाचा तपास सुरू केला. यानंतर व्यावसायिकाच्या हत्येच्या कटाचा तपास जसजसा पुढे जात होता, तसतसा पोलिसांना त्याची पत्नी निहारिका हिच्यावर संशय येऊ लागला. त्यानंतर पोलिसांनी खाकीची ताकद दाखवताच निहारिकाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि तिच्या साथीदारांची नावेही उघड केली.
चौकशीदरम्यान रमेशची हैदराबादमधील उप्पल येथे १ ऑक्टोबर रोजी हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. निहारिकाने रमेशकडे ८ कोटी रुपयांची मागणी केली होती, मात्र, त्याने ही रक्कम देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी पत्नी निहारिकाने प्रियकर निखिल साथीदार अंकुरसोबत पतीच्या हेत्येचा कट रचला.
त्यानंतर तिघांनी मिळून रमेशची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ८०० किलोमीटरचा प्रवास करत कोडागु जिल्ह्यातील एका कॉफीच्या मळ्यात मृतदेह जाळून टाकला. संशय येवू नये यासाठी आरोपी निहारिकाने पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मात्र, अखेर पितळ उघड पडलेच. विशेष म्हणजे, आर्थिक फसवणुकीप्रकरणी निहारिकाला यापूर्वी हरियाणामध्ये अटक करण्यात आली होती.