27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरक्राईमनामा...इट्स कोल्ड ब्लडेड मर्डर

…इट्स कोल्ड ब्लडेड मर्डर

Google News Follow

Related

तिला अगोदरच गंभीर आजाराने ग्रासले होते, त्यात ती लग्न करण्यासाठी चंद्रकांतच्या मागे सतत तगादा लावत होती. मात्र चंद्रकांतला तिच्यापासून कायमची सुटका हवी होती. त्याच्या डोक्यात एक योजना शिजू लागली. चंद्रकांत एका खाजगी रुग्णालयात वॉर्ड बॉयचे काम करीत होता. त्याने तडक रुग्णालयात गाठले, कुणाला न कळता त्याने रुग्णालयातील केटामाईन इंजेक्शनचे चार वायल्स, आयव्ही, इट्रॅकथ घेऊन बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी त्याने प्रेयसीला एका निर्जन ठिकाणी बोलावून घेतले. आपण लग्न करूया परंतु, तुझा आजार अगोदर बरा करू. त्यासाठी मी इंजेक्शन आणले आहे, ते तू घेत जा असे सांगून त्याने प्रेयसीचा हात हातात घेतला, तिच्या हाताची नस शोधत त्याने तिला आयव्ही लावली आणि इट्रॅकथद्वारे केटामाईनच्या चारही वायल्स आयव्हीतून देत तिचे डोके स्वतःच्या मांडीवर ठेवले. काही वेळातच तिचे शरीर थंडगार पडले. काम तमाम झाल्याचे बघून चंद्रकांतने तिच्या सोबत असलेल्या सर्व वस्तू एका ठिकाणी फेकून देत प्रेयसीचा मृतदेह त्याच ठिकाणी सोडून तेथून काढता पाय घेतला. चंद्रकातने कुणाला खबर न लागू देता अगदी थंड डोक्याने प्रेयसीची हत्या केली.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारच्या बेफिकीरीमुळेच मराठा आरक्षण गेलं

‘त्या’ सचिवांची बदली रोखण्यासाठी ममतांची धावपळ

फडणवीस-पवार सदिच्छा भेटीतून राजकीय चर्चांना उधाण

जूनमध्ये मिळणार १२ कोटी लसमात्रा

पनवेल तालुक्यातील नियोजित विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या कोली कोपर गाव येथील एका निर्जन ठिकाणी २९ मे रोजी ३५ ते ४० वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह पनवेल पोलिसांना सापडला. महिलेच्या अंगावर कुठल्याही जखमा, अथवा गळ्याभोवती कुठल्याही प्रकारच्या खुणा दिसून येत नसल्यामुळे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता. पनवेल शहर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद घेऊन मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. मृतदेह मिळून आला त्या आसपास पोलिसांनी शोधाशोध सुरू केली असता पोलिसांना एक पिशवी मिळाली. त्या पिशवीत एका महिलेची कागदपत्रे होती. या कागदपत्रांवरून मृत महिलेची ओळख पटवण्यात आली. तूरमाळे गावात राहणाऱ्या या महिलेच्या भावाने तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला, तिचे त्याच गावातील चंद्राकांत गायकर याच्यासोबत मागील सहा महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती दिली.

पनवेल शहर पोलिसांनी संशयावरून चंद्रकांत गायकर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत केटामाईन इंजेक्शनचे एकदाच चार डोस देऊन हत्या केल्याची कबुली दिली. आमचे सहा महिन्यांपासून प्रेम प्रकरण होते, मात्र तिला गंभीर आजार झाला होता, त्यात ती सतत लग्न करण्यासाठी तगादा लावत होती, यातून अनेक वेळा दोघांची भांडणे झाली होती. ती सतत धमकी देत असल्यामुळे तिची हत्या केल्याची कबुली चंद्रकातने पोलिसांकडे दिली. याप्रकरणी चंद्रकांत गायकर याला हत्या, गुंगीचे औषध देणे, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केटामाईन काय आहे?
केटामाईन हे विदेशात नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते.भारतात देखील केटमाईन ड्रग म्हणून वापरले जात आहे. केटामाईनचा खरा उपयोग रुग्णालयात ऑपरेशन पूर्वी रुग्णाला भूल (बेशुद्ध) देण्यासाठी वापर केला जातो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा