27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामामढ येथील हॉटेलमध्ये महिलेची हत्या, एकाला अटक

मढ येथील हॉटेलमध्ये महिलेची हत्या, एकाला अटक

Google News Follow

Related

मढ आयलँड येथील एका हॉटेलच्या खोलीत एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवार,१३ जुलै रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. ही हत्या  अनैतिक संबंधातून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

अमालुमरी चार्ली (४७) असे या महिलेचे नाव असून अमित भुवड (३६) यांच्यासोबत तिचे अनैतिक संबंध होते. हे दोघे मंगळवारी मुंबईतील मालाड येथील मढ आयलँड येथील एका लॉजवर आले होते. बुधवारी दुपारी लॉजचा कर्मचारी खोलीवरील मुक्काम वाढवायचा का हे विचारण्यासाठी आला असता त्याला खोली बाहेरून बंद असल्याचे दिसून आले. त्याने मॅनेजरला ही बाब कळवली असता मॅनेजरने बनावट चावीने खोलीचे टाळे उघडून आत प्रवेश केला असता एक महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तसेच तिच्यासोबत असलेला व्यक्ती दिसून न आल्यामुळे मॅनेजरने तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

हे ही वाचा:

राज्यातील नगरपरिषद निवडणूका लांबणीवर

शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल पाच रुपयांनी, डिझेल तीन रुपयांनी स्वस्त

पाकिस्तानात हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर करून मुस्लिम मुलाशी लग्न

असंसदीय शब्दांची यादी जाहीर; वाचा सविस्तर

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी महिलेला नजीकच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तीला तपासून मृत घोषित केले आहे. या महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. अमित भुवड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. दोघात क्षुल्लक कारणावरून वाद होऊन त्याने तीचा गळा आवळून हत्या केली अशी कबुली आरोपीने दिली आहे. मृत महिला ही विवाहित असून तीला तीन मुले आहेत, तिच्या पतीचे निधन झाले असून मुलाचा सांभाळ ती स्वतः करीत होती अशी माहिती समोर आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा