27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामालालबागच्या राजाला नवस करू दिला नाही, म्हणून तिने केले मुलाचे अपहरण

लालबागच्या राजाला नवस करू दिला नाही, म्हणून तिने केले मुलाचे अपहरण

२५ वर्षीय महिलेला अटक

Google News Follow

Related

लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाऊन तिला मुलगा होण्यासाठी नवस करायचा होता,परंतु पतीने इच्छा पूर्ण न केल्यामुळे तिने मालाड मालवणी येथून दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते. मात्र मालवणी पोलिसांनी मुलाचा शोध घेऊन १२ तासात या गुन्ह्याची उकल केली. या प्रकरणी २५ वर्षीय महिलेला अटक करून मुलाची सुखरूप सुटका केली आहे.

 

 

सोनम साहू (२५)असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. सोनम साहू ही पती आणि दोन मुलींसह मालाड पश्चिम मालवणी राठोडी येथे राहण्यास आहे. सोनमला दोन्ही मुलीचं झाल्या तिला मुलगा हवा होता. लालबागच्या राजा नवसाला पावतो असे तिने ऐकले होते. लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाऊन मुलगा व्हावा म्हणून नवस करण्यासाठी ती पतीच्या मागे लागली होती.

 

 

पतीने तिला आज जाऊ उद्या जाऊ असे सांगून टाळाटाळ केली. गुरुवारी विसर्जन असल्यामुळे आता वर्षभर आपल्याला लालबागच्या राजाला नवस करता येणार नाही म्हणून सोनम निराश झाली होती. आपल्याला मुलगा हवा म्हणून तिने गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मालवणी परिसरातून एका ९वर्षाच्या मुलीला २००रुपये दिले व तिला दुकानात पाठवून मुलीकडे असलेल्या दीड वर्षाच्या मुलाला पळवले.

 

हे ही वाचा:

कॉफी मेकरमध्ये लपवले होते २ कोटींचे सोने!

मणिपूरमध्ये धार्मिक स्थळांची सुरक्षा करण्याचे सरकारला निर्देश

मनीष मल्होत्रा डिझाइन करणार एअर इंडिया कर्मचाऱ्यांचे गणवेश

मराठी माणसाबाबत पुन्हा असं घडलं तर गालावर वळ उठतील!

 

या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी तात्काळ मुलाच्या शोधासाठी पोलीस पथकाला अपहरणकर्त्याच्या मागावर पाठवले.

 

 

पोलीस पथकाने तांत्रिक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करून १२तासात अपहरणकर्त्याचा शोध घेत सोनम साहूला अटक करून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. मुलगा होत नसल्यामुळे तसेच यावर्षी गणपतीला नवस करता येणार नसल्यामुळे तिने मुलाच्या हव्यासापोटी हे कृत्य केल्याची माहिती तपासात समोर आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा