उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही तरुणांकडून महिला पोलीस उपनिरीक्षकाचेच अपहरण केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे देशातील सामान्य महिलांसह सुरक्षा करणाऱ्या महिलांचा देखील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण विनय भंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी महिला उपनिरीक्षकावर सतत दबाव टाकत होता. मात्र, पोलीस महिला आपल्या निर्णयावर ठाम राहिली. त्यामुळे तरुणाने आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने महिला पोलीस अधिकाऱ्याचे अपहरण केले.
हे ही वाचा :
जिओचे नेटवर्क गायब; सोशल मीडियावर वापरकर्त्यांच्या तक्रारी
स्वयंसेवक ते पंतप्रधान… कसा होता नरेंद्र दामोदरदास मोदींचा ७४ वर्षांचा प्रवास?
नागालँड नागरिक हत्या प्रकरण: ३० जवानांवरील फौजदारी खटला रद्द
आतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री; केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत घडामोडी !
सध्या पिडीत महिला अधिकारी सुरक्षित असून या प्रकरणी त्यांनी बीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पिडीत महिला अधिकाऱ्याने सागितले की, विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी एका तरुणाकडून दबाव आणला जात होता, गुन्हा मागे न घेतल्यास याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, तसेच जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे महिला अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली जात आहे. लवकरच आरोपी तरुणाला अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.