जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर पेट्रोल बॉम्ब हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर पेट्रोल बॉम्ब हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे जवान दहशतवादी कारवायांना आळा घालत असतानाच एका अज्ञात व्यक्तीने थेट सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केल्याची घटना घडली. अज्ञात व्यक्तीने कॅम्पवर बॉम्ब फेकून हल्ला केला आहे.

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरातील सीआरपीएफ कॅम्पवर हा हल्ला करण्यात आला. एका अज्ञात व्यक्तीने पेट्रोल बॉम्ब फेकून घातपात करायचा प्रयत्न केला. मंगळवार, २९ मार्च रोजी संध्याकाळी एका अज्ञात व्यक्तीने सीआरपीएफ कॅम्पवर बॉम्ब फेकून हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

व्हिडिओमध्ये दोन पादचारी रस्ते दिसत असून रस्त्यावर वर्दळ दिसत आहे. अशातच एक बुरखा घातलेली व्यक्ती कॅम्पजवळ येते आणि रस्त्याच्या मधोमध थांबते. सोबत असलेल्या पिशवीतून ती काहीतरी बाहेर काढते आणि कॅम्पमध्ये फेकते. त्यानंतर त्या वस्तूचा भडका उडालेला दिसून येत आहे. त्यानंतर मात्र, ती व्यक्ती लगेच घटनास्थळावरून पळ काढते. भीतीने नागरिकही पळताना दिसून येत आहेत.

हे ही वाचा:

आपल्या शरीरातही जाते या मार्गाने प्लास्टिक

मोहित कंबोज यांची मागणी; मशिदींवर बेकायदेशीर भोंगे हटवा!

महाराष्ट्रातील या ठिकाणांवर होणार ग्रीनफिल्ड विमानतळ

शाळकरी विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी लांबणीवर!

सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू आहे. हा हल्ला करणारी महिला आहे की पुरूष दहशतवादी ते कळू शकलेले नाही. या घटनेतील बुरखाधारी व्यक्तीचा आता शोध घेतला जातो आहे. मात्र, या हल्ल्यात सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही.

Exit mobile version