बेंगळुरूत महिला भूवैज्ञानिकाची चाकूने हत्या!

महिला अधिकाऱ्याला घरात एकटे पाहून हल्लेखोराने संधी साधत केली हत्या

बेंगळुरूत महिला भूवैज्ञानिकाची चाकूने हत्या!

कर्नाटक सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या ३७ वर्षीय भूवैज्ञानिकाची बेंगळुरू येथील राहत्या घरी वार करून हत्या करण्यात आली आहे.पोलिसांनी रविवारी या घटनेची माहिती दिली.पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रतिमा यांच्या भावाने त्यांना अनेकवेळा फोन केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. बहिणीला पाहण्यासाठी तो सकाळी घरी पोहोचला तेव्हा त्याने तिला मृतावस्थेत पाहिले.पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत प्रतिमा ही बेंगळुरू येथे वास्तव्यास होती. प्रतिमा ही भूवैज्ञानिक म्हणून कर्नाटकमध्ये काम करत होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील खनिकर्म आणि भूगर्भशास्त्र विभागात उपसंचालक म्हणून कार्यरत असलेल्या प्रतिमा यांच्या घरात घुसून अज्ञाताने तिच्यावर चाकूने हल्ला करण्यात केला व त्यावेळी तिचा मृत्यू झाला.हल्ल्यावेळी प्रतिमा घरात एकटीच असल्याचे पोलिसांनी सांगितले.मृत प्रतिमा ही घरात एकटीच असून तिचे पती त्यांच्या मूळ गावी तीर्थहल्ली येथे सहलीला गेले होते.

हे ही वाचा:

आयएएस बनण्याची गोष्ट… सहा गोळ्या लागूनही जिवंत!

कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील

नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरचा अपघात

बुडत्याचा पाय खोलात, आता ड्रग्ज प्रकरणीही आरोप

पोलिसांनी सांगितले की, प्रतिमा यांच्या ड्रायव्हरने शनिवारी रात्री आठच्या सुमारास तिला घरी सोडले होते.प्रतिमा यांच्या भावाने त्यांना अनेक वेळा फोन केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. बहिणीला पाहण्यासाठी तो सकाळी घरी पोहोचला तेव्हा तिला मृतावस्थेत पाहिल्याचे भावाने सांगितले.हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.या हत्येमध्ये मृत प्रतिमाच्या ओळखीच्या अथवा नातेवाईकांचा हाथ असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, महिला अधिकाऱ्याच्या हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या प्रकरणाबाबत अधिक माहितीसाठी चौकशी करणार असल्याचे त्यानी सांगितले.

 

Exit mobile version