१४ वर्षे गायब असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक करताना ओळखली ही खूण

पोलिसांना गुंगारा देण्यात ठरत होती यशस्वी

१४ वर्षे गायब असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक करताना ओळखली ही खूण
१४ वर्षांपासून पोलीस ज्या महिलेचा शोध घेत होते, ती  महिला अखेर मांडवी पोस्ट ऑफिस येथे सापडली आहे. तिने काही वर्षांपूर्वी  एक गुन्हा केला होता परंतु तिला जामीन मिळाला. त्याचा फायदा घेऊन ती पळून गेली आणि तब्बल १४ वर्षांसाठी ती गायब होती.
ह्या महिलेचं नाव मंजुळा देवेंद्र असून २००८ मध्ये ही एका एयर कंडिशनर उत्पादन कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती. अकाउंटंट म्हणून काम करत असताना तिने एक कोरा चेक चोरला आणि त्या चेक द्वारे तिने ४५ हजार रुपये काढले. “ती पळाल्यानंतर आम्ही शहरातल्या वस्त्या शोधून काढल्या पण तिचा पत्ता लागला नाही. म्हणूनच या वेळी आम्ही एक सापळा रचला. तिच्या खोलीचा शोध घेण्यासाठी आम्ही चाळ पुनर्विकासाचे बनावट अधिकारी म्हणून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले. आम्हाला तिची खोली सापडली पण ती तिथे नव्हती म्हणून आम्ही तिच्या शेजाऱ्यांना तिच्याबद्दल विचारले. तिच्या शेजाऱ्यांनी आम्हाला तिचा नवीन फोन नंबर दिला. नंबर मिळाल्याने तिचा माग काढण्यात आम्हाला यश आले. दिवसा नागदेवी रोड आणि रात्री घाटकोपर असे तिचे लोकेशन होते “, असे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान सुरु

उत्तराखंड, गुजरातनंतर महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू होणार?

साडेतीन मिनिटानंतर ती ‘पास्ता’वली आणि तिने केली कंपनीची तक्रार

राज्याबाहेर प्रकल्प का गेले याचे कारण येणार समोर

दोन्ही भाग गजबजलेले असल्याने तिला शोधणे पोलिसांसाठी कठीण झाले. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने भारतीय पोस्ट ऑफिसर म्हणून तिचे वॉट्सअप  प्रोफाइल बदलले आणि मंजुळाला सांगितले की जर ती वेळेवर पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचली नाही तर तिची चाळीतील खोली उद्ध्वस्त होईल. आश्चर्य म्हणजे मंजुळा प्रत्यक्षात पोस्ट ऑफिसला आली आणि पोलिसांनी तिला ताबडतोब अटक केली. “आम्हाला तिच्या परिसरात खूप मंजुळा नावाच्या बायका सापडल्या. चतुराईने तिने आपले नाव मंजुळा देवेंद्र यावरून मंजू नायर केले. परंतु तिच्या हातावर असलेल्या टॅटूमुळे आम्ही तिला ओळखले आणि तिला अटक केली”,
Exit mobile version