मोबाईल चोराला रोखताना धावत्या रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू

मोबाईल चोराला रोखताना धावत्या रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू

मोबाईल चोराला विरोध करतांना डोंबिवलीत राहणाऱ्या नोकरदार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ठाण्यात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. कामावरून घरी रिक्षातून जात असताना मोबाईल चोराला विरोध करताना एका तरुणीचा धावत्या रिक्षातून पडून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील तीन हातनाका येथे घडली. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून गुरुवारी दोन मोबाईल चोरांना अटक केली आहे.

कळवा स्थानकात एका रेल्वेत मोबाईल चोराशी झालेल्या झटापटीनंतर त्या गाडीतून पडून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेने पुन्हा एकदा त्या घटनेची आठवण ताजी झाली आहे.

कन्मीला आरांगसू रायसिंग (२७) असे या तरुणीचे नाव असून तीन मिझोराम राज्यातील नागरिक आहे. मुंबईतील सांताक्रूझ पूर्व सीएसटी रोडवरील कलिना व्हिलेज रोड येथे कन्मीला आरांगसू रायसींग ही मैत्रिणीसह भाडेतत्त्वावर राहात होती.

हे ही वाचा:

अजितदादा आणि पत्रकारांची गळचेपी

जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा पुन्हा उच्छाद…ग्रंथालयात घुसखोरी, गार्डलाही मारहाण

आढावा बैठकीच्या नावाखाली काँग्रेसची कव्वाली मैफिल

दोन महिला मॅनहोलमध्ये पडल्या; पालिकेचे दावे पडले उघडे

ठाण्यातील विवियाना मॉल येथील एका स्पा सेंटर मध्ये काम करणारी कन्मीला ही लालगुरसांगी चेचोमा फँन्चुंन (३०) या सहकारी मैत्रिणीसह बुधवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल येथून रिक्षाने घरी जात असताना ठाणे तीन हात नाका येथे पाठीमागून बाईक वर आलेल्या दोघांपैकी एकाने कन्मीला हिच्या हातातील मोबाईल फोन खेचून पळ काढला.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे कन्मीला आरांगसू रायसींग ही तरुणी धावत्या रिक्षातून खाली पडून तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्याच रिक्षातून सोबत असलेल्या मैत्रिणीने कन्मीलाला कळवा येथील रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन कन्मीला रायसिंग हिची मैत्रीण लालगुरसांगी चेचोमा फँन्चुंन हिचा जबाब नोंदवून बाईकवर आलेल्या दोन मोबाईल चोराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौपाडा पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोघांना गुरुवारी दोघांना अटक केली आहे.

Exit mobile version