अतिरिक्त पावसामुळे मुंबई सह इतर शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ठाणे, दिवा नंतर कल्याण पश्चिमेकडील शहाडमध्ये पुलावरील खड्ड्यांमुळे महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. कविता म्हात्रे असे महिलेचे नाव असून, दुचाकीवरून आपल्या कार्यालयात जात असताना, शहाड येथील पुलावर पडलेल्या खड्डे चुकवण्याचा प्रयत्नांन असताना टँकरच्या चाकाखाली येऊन महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमधील रस्त्याची चालण झाली असून, वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागत आहे, असा आरोप कविता म्हात्रे यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे.
म्हारळ परिसरात राहणाऱ्या कविता या कल्याण पूर्व परिसरातील टाटा नाका येथे पेट्रोल पंपावर नुकत्याच कामाला लागल्या होत्या. दुपारी कामावर जात असताना शहाड येथील पुलावरील खड्डे वाचण्याच्या प्रयत्नात असताना अचानक ब्रेक दाबला त्या दुचाकीसह खाली पडल्या त्यामुळे मागून येणाऱ्या टॅंकर खाली चिरडून म्हात्रेचा जागच्या जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा:
‘उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, धोका देणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे’
‘मेधा पाटकर यांनी नर्मदा आंदोलनातून दिशाभूल केली आता माफी मागा’
हिंदू संस्कृतीबद्दल डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी इंग्रजांना काय सुनावले?
५० फुटवरून झुला खाली आदळला आणि
मयत कविता म्हात्रे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आले असून, या घटनेची महात्मा फुले चौक पोलीस स्थानकात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहाड पुलावरील खड्डे हे मोठ्या आकारांचे असून रस्त्याच्या बाजूला माती साचून राहिली आहे. रस्त्यावरील मातीमुळेच अपघात झाल्याचा पोलिसांनी प्रथम अंदाज वर्तवला आहे. खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा उपयोग करण्यात आला असून या ब्लॉकमुळेच वाहने घसरतात. विशेष म्हणजे अपघातामध्ये दुचाकीस्वारांचा जास्त प्रमाणात मुत्यू हा खड्ड्यांमुळे होतो.