राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मंत्रालयात खळबळ उडाली होती. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे नुकसान करून ही महिला मंत्रालयातून निघून गेली. यानंतर पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी या महिलेचा शोध सुरु केला आहे. पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला गुरुवारी संध्याकाळी पास न काढता मंत्रालयात गेली होती. त्यावेळी मंत्रालयाच्या परिसरात फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. कर्मचाऱ्यांचीही घरी जाण्याची वेळ असल्यामुळे लोकांचा वावरही कमी होता. त्यामुळे ही महिला कोणाच्याही लक्षात न येता सचिवांच्या गेटने सहजपणे आतमध्ये शिरली. त्यानंतर महिला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाजवळ गेली आणि तिने तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही महिला इथून निघून गेली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
या महिलेने कार्यालयाबाहेर देवेंद्र फडणवीसांची नेमप्लेट काढून फेकली आणि यानंतर घोषणाबाजी केली. तसेच काही कुंड्याही तिने उचलून फेकल्या ही महिला कोण होती, ती विनापास आतमध्ये कशी शिरली या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. मरिनड्राईव्ह पोलिसांनी सध्या या घटनेचा तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा :
२०१९ नंतर प्रथमच, तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांनी काश्मीरचा उल्लेख टाळला!
बांगलादेशी पॉर्नस्टार उल्हासनगरात, पोलिसांकडून अटक
आसाम आयईडी प्रकरण: एनआयएकडून उल्फा (आय) च्या कार्यकर्त्याला अटक
इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या हवाई दलाचा कमांडर ठार
दरम्यान, या घटनेमुळे मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. ही महिला गुरुवारी रात्री मंत्रालयात शिरली. त्यावेळी मंत्रालयाच्या परिसरात फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे ही महिला कोणाच्याही लक्षात न येता सचिवांच्या गेटने सहजपणे आतमध्ये शिरली. यानंतर ही महिला फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर केली आणि त्याठिकाणी तोडफोड केली.