घरकाम करता करता तिने ‘साफ’ केली अनेक घरे

घरकाम करता करता तिने ‘साफ’ केली अनेक घरे

मोलकरीण म्हणून काम करताना घरातील दागिने, पैसे आणि मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या एका महिलेला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. गुंगीच्या औषधाच्या मदतीने आरोपी महिला लोकांच्या घरात चोरी करून पळ काढत असे. शांती चंद्रन (४३) असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला तामिळनाडूतून अटक केली आहे. शांतीकडून पोलिसांनी ६० लाख ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आला आहे.

शांती हिने पुण्यातील कोरेगाव पार्क, बंडगार्डन, येरवडा, लष्कर, समर्थ, खडक, वानवडी आणि कोंढवा या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उच्चभ्रू इमारतींमधील नागरिकांना लक्ष्य केले होते. शांती ही घरकाम करण्याच्या बहाण्याने लोकांच्या घरात जात असे. तीन ते चार दिवसांत ती लोकांचा विश्वास संपादन करून आपला डाव साधत असे. शांती लोकांना चहा, पाणी किंवा जेवणात गुंगीचे औषध मिसळवून देत असे. घरातील व्यक्ती बेशुद्ध पडला की, शांती घरातील दागिने, रक्कम, मौल्यवान समान आदी लंपास करीत असे.

हे ही वाचा:

संजयजी…आता कोणाचे थोबाड फोडायचे?

एका वर्षात मुंबईत पकडलेल्या अमलीपदार्थ विक्रेत्यांचा आकडा धक्कादायक

लस येता घरा, तोचि दिवाळी दसरा; घरोघरी लसीकरणाचा मोदींचा निर्णय

दहाचे नाणे देताना येतायत नाकीनऊ… वाचा!

वानवडी येथे राहणाऱ्या मधुबाला प्रवीण सेठिया (६३) यांनी त्यांच्या घरी झालेल्या चोरीबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर संबंधित प्रकरण उघडकीस आले. घरातील कपाटात असलेले १० लाख ५२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार सेठिया यांनी केली होती. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी शांती हिला तामिळनाडू मधून अटक केली.

शांती हिने २०१८ ते २०२१ या कालावधीत ११ चोऱ्या केल्या होत्या आणि चोरी केलेला सर्व ऐवज तिने तमिळनाडूतील आपल्या मूळ गावी लपवून ठेवला होता, अशी कबुली तिने दिली.

Exit mobile version