गडचिरोलीत चकमकीत पोलिसांकडून दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

चकमकीच्या ठिकाणाहून रायफल जप्त

गडचिरोलीत चकमकीत पोलिसांकडून दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. गडचिरोलीपासून सुमारे ९०० किमी अंतरावर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळील असलेल्या धमचा गावातील अहेरी येथे सकाळी ही चकमक झाली. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने जंगल परिसरात घेराव घातला. यादरम्यान माओवाद्यांच्या एका गटाने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

अहेरी तालुक्यातील दामरंचा गावापलीकडे छत्तीसगड राज्याची सीमा प्रारंभ होते. दक्षिण गडचिरोली परिसराला लागून असलेल्या छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील जंगलात बराच काळ ही चकमक सुरु होती. पोलिसांनी छत्तीसगड सीमेपर्यंत सुमारे दहा किलोमीटरपर्यंत दहशतवाद्यांचा पाठलाग केला. शोध घेतल्यानंतर पोलिस पथकाला घटनास्थळी एक पुरुष आणि एका महिलेचे मृतदेह सापडले. दोघेही नक्षल दलमचे विभागीय कमांडर-स्तरीय सदस्य होते. चकमकीच्या ठिकाणाहून एक इन्सास रायफल आणि एक सेल्फ-लोडिंग रायफल जप्त केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या परिसरात नक्षल्यांच्या हालचाली सुरु असल्याची माहिती गडचिरोली पोलीस दलाला मिळाली होती. पोलीस दलाच्या सी-६० पथकाचे जवान आणि छत्तीसगडच्या बिजापूर पोलिसांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले. पोलीस दिसताच नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात दोन नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीची सदस्य असलेल्या एका महिलेचाही समावेश आहे. तिच्याकडून एक बंदूक ताब्यात घेतल्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.

हे ही वाचा :

आम्ही करू ते कौतुक, तुम्ही कराल तो अपमान

आज ४०५ खेळाडूंवर होणार बोली, ‘हे’ खेळाडू होऊ शकतात मालामाल

शिकलात तर याद राखा! अफगाणिस्तानात विद्यापीठे, लायब्ररीतून हाकलले महिलांना

पश्चिम रेल्वे करणार ६ गाड्यांचा विस्तार

याअगोदर काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कारवाईत गडचिरोली जिल्ह्यातील कोयर जंगल आणि झारेवाडा येथून तीन कथित नक्षलवाद्यांना अटक करण्यात आले. या तिघांवर एकूण दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. नागपूरपासून सुमारे १७० किलोमीटर अंतरावर या नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती.

Exit mobile version