जयपूर-मुंबई रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधील भीती अद्याप दूर झालेली नाही. चौघांची हत्या करणाऱ्या आरपीएफ जवान चेतन सिंहची तुलना अजमल कसाबशी केली जात आहे. ‘गोळीबाराचा आवाज ऐकला तेव्हा मला सुरुवातीला शॉर्ट सर्किट झाल्यासारखे वाटले. पण पुढे गेल्यानंतर पाहिले तर रेल्वेमध्ये रक्ताचे थारोळे होते. मला अजमल कसाबचीच आठवण आली,’ असे या प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
या दुर्घटनेत एएसआय टीकाराम मीणा, ४८ वर्षीय असगर अब्बास शेख, ६४ वर्षीय अब्दुल कादिर मोहम्मद हुसैन भानपुरवाला आणि ४० वर्षीय सैयद सैफुल्लाह मारले गेले.
हे ही वाचा:
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत १५ पदांसाठी दुप्पट अर्ज
गणेशोत्सवाची तयारी सुरू; एसटीकडून २ हजार २०० जादा गाड्या सोडणार
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्या ‘शिदोरी’ वरही गुन्हा दाखल करणार
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९४ लाख अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे
ट्रेनच्या कोच बी -५ मधील ४१ वर्षीय अटेन्डन्ट कृष्णकुमार शुक्ला यांनी त्या दिवशीचा प्रसंग कथन केला. ‘मी बी५चा कोट अटेन्डन्ट होतो. त्यामुळे मला बी ५ आणि बी ६च्या मध्ये झोपायचे होते. मात्र तब्येत ठीक नसल्याने मी जागा बदलली आणि बी ५ आणि बी ६च्या मध्ये झोपलो. मात्र अचानक पहाटे पाच वाजता कशाच्या तरी आवाजाने मला जाग आली. सुरुवातीला मला वाटलं की शॉर्ट सर्कीट झाले. म्हणून मी उठून बी ५मध्ये गेलो. तेव्हा तिथे सिंह हातात रायफल घेऊन उभा होता. तर, मीणा जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर सिंह बी ४च्या दिशेने गेला. त्यानंतर दरवाजात झोपलेली एक व्यक्ती पळतच माझ्याकडे आली आणि तिने सांगितले की, एका आरपीएफ जवानाने दुसऱ्या जवानाची हत्या केली,’ असे शुक्ला यांनी सांगितले. त्याआधी त्या दोघांमध्ये बराच वेळ वाद सुरू होते, असेही त्या प्रवाशाने सांगितले.
‘सिंह बी ४ कोचच्या दिशेने गेला. तिथे त्याने भानपूरवाला याला तर, मोईनुद्दीन याला पँट्री कोच येथे आणि शेख याला एस ६ येथे गोळी मारली. चेतन सिंहने त्याची तब्येत बरी नसल्याने त्याला ड्युटीवरून लवकर घरी सोडण्याचे वरिष्ठ अधिकारी टीकाराम मीणा यांना सांगितले होते. मात्र मीणा यांनी नकार दिल्यामुळे चेतन नाराज होता, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.