25 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरक्राईमनामालोकलमध्ये फुकटची थंड हवा घेणारे प्रवासी वाढले

लोकलमध्ये फुकटची थंड हवा घेणारे प्रवासी वाढले

एप्रिल २०२२च्या तुलनेत तब्बल २६० टक्क्यांहून अधिक फुकटे पकडले गेले आहेत

Google News Follow

Related

सूर्य डोक्यावर आग ओकत असल्याने वातावरणातील उष्म्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यातून दिलासा मिळावा, यासाठी लोकांकडून नानाविध पर्यायांचा अवलंब केला जात आहे. मात्र आता उन्हाळ्यात गारेगार प्रवास करण्याचा मोहदेखील रेल्वेप्रवाशांना होऊ लागला आहे. त्यासाठी एसी लोकलमध्ये चढून या गारेगार प्रवासाची अनुभूती ते घेत आहेत. मात्र त्यात फुकटे प्रवासीच अधिक असल्याचे रेल्वे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

उन्हाळ्याचा मोसम सुरू झाल्यानंतर पश्चिम रेल्वेनेही एसी रेल्वेमधून फुकट्या प्रवाशांवरील कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. एप्रिल महिन्यात पकडण्यात आलेल्या तब्बल सहा हजार ३५३ प्रवाशांकडे कागदी तिकीट नव्हते. ही वाढ गेल्या म्हणजेच एप्रिल २०२२च्या तुलनेत तब्बल २६० टक्क्यांहून अधिक आहे. एप्रिल २०२२मध्ये एक हजार ७५४ फुकटे प्रवासी पकडले गेले होते. या फुकट्या प्रवाशांकडून तब्बल २१ लाख ३४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल २०२२मध्ये सहा लाख ३१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला होता. दंडाच्या रकमेची ही वाढ तब्बल २३८ टक्के आहे.

हे ही वाचा:

मान्सूनपूर्वी आणखी पाच चित्ते कुनो अभयारण्यात

आफताबवर खुनाचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप निश्चित; श्रद्धा वालकर हत्या

मध्य प्रदेशनंतर ‘या’ राज्यात ‘द केरळ स्टोरी’ करमुक्त!

“‘सामना’मधील अग्रलेखाला महत्त्व देत नाही”

एसी ट्रेनमध्ये अवैध प्रवासी प्रवास करत असल्याच्या तक्रारी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यामुळे पश्चिम रेल्वेने ही मोहीम हाती घेतली आहे. पश्चिम रेल्वे सहा डब्यांच्या ७९ एसी लोकल चालवते. उन्हाळ्यात वाढ होऊ लागल्याने एसी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेन् दिवस वाढू लागली आहे. एप्रिल २०२३मध्ये दररोज सरासरी ९०१ हजार प्रवाशांनी एसी रेल्वेमधून प्रवास केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा