25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामारासायनिक बॉम्बस्फोट घडवून २६/११ पेक्षा मोठ्या हल्ल्याचा होता कट

रासायनिक बॉम्बस्फोट घडवून २६/११ पेक्षा मोठ्या हल्ल्याचा होता कट

देशात मोठ्या प्रमाणावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट आखला जात होता

Google News Follow

Related

दिल्ली पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या तीन दहशतवाद्यांच्या चौकशीतून गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. मुख्य आरोपी शाहनवाझ याने साथीदारांसोबत दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील १८ जागांची रेकी केली होती. देशात मोठ्या प्रमाणावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे आदेश त्यांना सीमेपलीकडून मिळाले होते. आयएसआयच्या या पुणे मॉड्युलमध्ये तरुणांना भरती करण्यासह त्यांना स्फोटके तयार करणे व स्फोट घडवण्याचे प्रशिक्षणही दिले जात होते.

 

या दहशतवाद्यांनी केवळ रासायनिक बॉम्ब बनवले नाही तर पुण्यातील जंगलामध्ये स्फोटाची ट्रायलही केली. देशातील अनेक गर्दीचे आणि व्हीआयपींचे परिसर त्यांचे लक्ष्य होते. शाहनवाझ याच्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात द्रवरूपी रसायने जप्त करण्यात आली आहेत. त्याचा वापर आयईडी स्फोटांसाठी करणार होते. आयईडी स्फोटके बनवण्यात हे दहशतवादी कुशल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दहशतवाद्यांच्या गटात सहभागी करवून घेतलेल्या संशयितांचीही धरपकड करण्यात आली असून त्यांचीही कसून चौकशी केली जात आहे.

 

पुणे पोलिस आणि एनआयएच्या टीमने काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांच्या तपासासाठी राजधानीच्या मध्य दिल्ली आणि दक्षिण पूर्व दिल्लीच्या काही परिसरात छापे टाकले होते. काही दिवसांपासून एनआयए दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशसमवेत अनेक राज्यांत सातत्याने छापे मारत आहे. या दरम्यान एनआयएच्या पथकांनी शस्त्रे आणि दारूगोळाही जप्त केला आहे.

हे ही वाचा:

फडणवीस म्हणाले, राज्यात भाजपाच बॉस!

मुंबई पोलीस दलात ‘मिशन कर्मयोगी’ उपक्रम राबविण्यात येणार

घुस के मारणारा अज्ञातांचा वॅगनर ग्रुप…

ट्रॅकवर दगड, लोखंडी रॉड ठेवून वंदे भारतला अपघात घडविण्याचा कट!

या दहशतवाद्यांनी देशातील अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे उभारली होती. याच केंद्रात त्यांच्या टोळीमध्ये सहभागी होणाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात होते. तसेच, आयईडी स्फोटाची ट्रायलही घेतली जात होती. याचा दैनंदिन अहवाल सीमेपलीकडील त्यांच्या बॉसला दिला जात होता. मात्र त्यांना सर्व साहित्य स्थानिक ठिकाणावरूनच घेण्याचे आदेश दिले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा