मीरा भाईंदर पोलिसांनी पकडले ‘लखोबा लोखंडे’ला

विविध नावे, ओळखपत्रांसह करत होता फसवणूक

मीरा भाईंदर पोलिसांनी पकडले ‘लखोबा लोखंडे’ला

व्यक्ती एक मात्र त्याची रूपे अनेक अशा एका बहुरूपीला मीरा भायदंर पोलिसांनी अटक केली आहे. या बहुरूपीयाने आयकर आयुक्त, आयआरएस अधिकारी, आयपीएस, सीबीआय अधिकारी तर कधी पत्रकार बनून बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधीचा गंडा घातला आहे.

या बहुरूप्याकडे जवळपास दोन ते तीन डझन वेगवेगळ्या सरकारी विभागाचे ओळखपत्रे सापडली आहेत.
रिंकू जितू शर्मा (३३) असे अटक करण्यात आलेल्या बहुरुपी आरोपीचे नाव आहे.

नवीमुंबईतील तळोजा येथे राहणारा तोतया पेशाने वाहन चालक आहे.मीरा भायदंर पोलीस आयुक्ताच्या हद्दीतील पेल्हार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात रिंकू शर्मा याने फिर्यादीना आयकर विभागाचे आयुक्त असल्याचे सांगितले होते,

लाल दिव्याच्या गाडीतून फिरणाऱ्या रिंकू हा खरोखर आयकर आयुक्त असल्याची फिर्यादी खात्री पटली होती. रिंकूने फिर्यादीला आयकर विभागाचे आयुक्त असल्याचे भारत सरकार लिहलेले ओळखपत्र देखील दाखवले होते. फिर्यादीने आपल्याला मुलीला नोकरीला लावण्यासाठी रिंकूकडे शब्द टाकला होता, रिंकूने त्यांच्या मुलीला आयकर विभागात नोकरीला लावतो असे सांगून यांच्याकडून १५ लाख उकळले होते,

हे ही वाचा:

‘हिंदूंना एका धाग्यात बांधणारा उपक्रम म्हणजे हिंदू आध्यात्मिक सेवा मेळावा’

मंगल प्रभात लोढांच्या हस्ते देशातील पहिल्या फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण!

‘दारूच्या व्यसनामुळे विनोद वारंवार संकटात सापडत गेला!’

आसाम: कोळसा खाणीत अडकलेल्या ९ कामगारांपैकी एकाचा मृत्यू!

त्या नंतर त्याने फिर्यादी यांच्या मुलीला आयकर विभागाचे बनावट ओळखपत्र आणि नियुक्ती पत्र दिले होते. मात्र हे ओळखपत्र आणि नियुक्ती पत्र बोगस असल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी रिंकू शर्मा यांच्याकडे दिलेल्या पैशांची मागणी केली, शर्मा याने पैसे देण्यास टाळाटाळ करू लागल्यामुळे फिर्यादी यांनी रिंकू शर्मा बद्दल माहिती काढली असता तो तोतया असल्याचे समोर आले.

फिर्यादी यांनी पेल्हार पोलिस ठाण्यात तक्रार डाक केल्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने रिंकू शर्मा याचा शोध घेऊन नवीमुंबईतून रिंकू शर्मा या तोतया सरकारी अधिकारी याला अटक करण्यात आली.

रिंकू शर्माच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्या घरातून २८ सरकारी ओळखपत्रे जप्त करण्यात आले आहे. हे ओळखपत्र आयकर आयुक्त, आयआरएस अधिकारी, आयपीएस, सीबीआय अधिकारी आणि पत्रकार असल्याचे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिंकू शर्मा या तोतयाने वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी सांगून जवळपास ४० जणांना सरकारी नोकरीचे अमिश दाखवून जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

Exit mobile version