२२ वर्षांपासून फरार असलेला दहशतवादी भुसावळ मध्ये सापडला!

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कारवाई

२२ वर्षांपासून फरार असलेला दहशतवादी भुसावळ मध्ये सापडला!

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सिमी (स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) शी संबंधित असणारा गुन्हेगार हनिफ शेख याला महाराष्ट्रातील भुसावळ येथून अटक केली आहे.दहशतवादी हनिफ शेख गेल्या २२ वर्षांपासून फरार होता. पोलिसांचे पथक गेल्या चार वर्षांपासून हनिफचा पाठलाग करत होते.अखेर पोलीस पथकाला यश आले आहे.

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, महाराष्ट्रातील भुसावळ येथून सिमी या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य हनीफ शेख याला तब्बल २२ वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे.त्याला २००२ मध्ये न्यायालयाने फरार घोषित केले होते. दहशतवादी हनिफ शेख याच्यावर २००१ मध्ये न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलिस ठाण्यात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.या प्रकरणात ट्रायल कोर्टाने त्याला २००२ साली फरारी गुन्हेगार घोषित केले होते.आरोपी हनिफ शेख गेल्या २२ वर्षांपासून तो फरार होता.आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या चार टीम पाठलाग करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा..

महिनाभरात रामलल्लाच्या चरणी २५ किलो सोने, चांदीचे दागिने अर्पण

पुढील तीन महिने ‘मन की बात’ ला सुट्टी

राष्ट्रध्वजाला म्हटले ‘सैतानी’; फ्रान्सने केले मुस्लिम धर्मगुरूला हद्दपार

अशोक चव्हाण कामाला लागले; तब्बल ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश!

पोलिसांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी आम्हाला माहिती मिळाली की, आरोपी हनिफ शेख उर्फ ​​हनिफ हुंडई हा स्वतःचे नाव बदलून मोहम्मद बनला आहे.मोहम्मद या नावाने तो महाराष्ट्रातील भुसावळ येथील एका उर्दू शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे, अशी माहिती आमच्या पथकाला मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, माहिती मिळाल्यानंतर भुसावळ येथील खडका रोड,आशा टॉवर या ठिकाणी आमच्या पथकाकडून सापळा रचण्यात आला.यानंतर २२ फेब्रुवारी रोजी दुपारी २:५० च्या सुमारास मोहम्मदीन नगरकडून खडका रोडच्या दिशेने येणाऱ्या संशयित व्यक्तीला हनिफ शेखला पथकाने ओळखले.यानंतर पथकाने आरोपीला घेराव घालत त्याला पकडले.हनिफ शेख विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपी हनीफच्या शोधासाठी पोलिसांच्या विशेष सेल टीमने देशाच्या अनेक भागांमध्ये, विशेषतः दिल्ली/एनसीआर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूला भेट दिली आणि माहिती गोळा केली. या संपूर्ण कारवाईदरम्यान त्याने वेगवेगळ्या राज्यात फिरून मोस्ट वाँटेड हनिफ शेखचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत त्याला अखेर अटक केली.

Exit mobile version