27 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरक्राईमनामापुण्यात पोलिसांनी 'कोयता गँग'च्या गुंडाला यथेच्छ चोपल्याची घटना व्हायरल

पुण्यात पोलिसांनी ‘कोयता गँग’च्या गुंडाला यथेच्छ चोपल्याची घटना व्हायरल

पोलिसांच्या धाडसाचे होत आहे कौतुक

Google News Follow

Related

पुण्यात सिंहगड कॉलेज कॅम्पस भागात एका गुंडाचा पाठलाग करत त्याला पोलिसांनी चांगलेच बदडून काढण्याची घटना व्हायरल होत आहे.

या गुंडाने हैदोस घातला होता. कोयता घेऊन त्याने अनेकांवर हल्ला केल्याचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत. या विकृत युवकाने रस्त्यावर चालणाऱ्या लोकांवर हल्ला केलाच शिवाय दुकाने, ठेले यावरही हल्ला करून लोकांना जखमी केले, दुकानांचे नुकसान केले. ते करत असतानाच पोलिसांनी ही खबर लागली आणि त्यांनी त्या तरुणाचा पाठलाग केला. तो तरुण धावू लागला पण पोलिसांनी त्याची पाठ सोडली नाही. धावता धावता तो एका बोर्डवर धडकला आणि पडला. तेव्हा पोलिसांनी त्याला फरफटत रस्त्यावर आणले आणि काठीने चांगला चोप दिला.

त्याचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे स्वागत केले जात आहे. अशाच पद्धतीने अशा विकृतांना मारले पाहिजे अशी भावना लोकांकडून व्यक्त होत आहे.

यानिमित्ताने अशा गुंडगिरीची चर्चाही पुन्हा सुरू झाली आहे. धारदार शस्त्रे घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या घटना गेल्या काही दिवसात तिथे वाढल्या आहेत. त्यावर अंकुश कोण ठेवणार असा सवालही लोक विचारत आहेत. या घटनेमुळे लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी अशा कारवाया वारंवार करून अशा गुंडांच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत अशी लोकांची भावना आहे.

हे ही वाचा:

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांच्यावर अंत्यसंस्कार

ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश

निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?

मुळशी पॅटर्न या चित्रपटातही अशा गुंडगिरीचे दर्शन झाले होते. त्यातून परिसरात कशी दहशत निर्माण होते आणि लोकांचे जगणे मुश्किल होऊन जाते हा विषयही त्यात हाताळण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा