काश्मिरी पंडितांवरील अत्याचार उघड करणाऱ्या ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटानंतर या मुद्द्यावरील चर्चेला उधाण आले आहे. एका वकील आणि सामाजिक कार्यकर्त्याने राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना एक यावर पत्र लिहले आहे. त्या पत्रात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याच्याराचे सर्व खटले पुन्हा उघडण्याची आणि काश्मीर खोऱ्यातील हत्यांच्या घटनांची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे.
वकील आणि सामाजिक कार्यकर्ते विनीत जिंदाल यांनी राष्ट्रपतींना या खटल्यांबाबत स्पष्ट चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या वकिलांनी १९८९-१९९० मधील काश्मिरी पंडितांची प्रकरणे पुन्हा उघडण्याची आणि त्यांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे.
जिंदाल यांनी राष्ट्रपतींना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, ” एसआयटीने आतापर्यंत नोंदवलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करावी. आणि त्यावेळी ज्या पीडितांनी तक्रार दाखल केली नाही त्यांची तक्रार आता घ्यावी. तसेच ३३ वर्षांपूर्वी झालेल्या शीखविरोधी दंगलींशी संबंधित खटले पुन्हा उघडून पुन्हा तपासले जावेत. तर २७ वर्षांपूर्वी घडलेल्या काश्मिरी पंडितांची प्रकरणेही पुन्हा उघडावीत आणि त्यांची पुन्हा सखोल तपासणी घ्यावी.”
हे ही वाचा:
“शिवसेनेने ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ यांना स्वीकारले आहे”
योगी आदित्यनाथ या दिवशी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
एमआयएम शिवसेनेला म्हणते, मला बी जत्रंला येऊ द्या की!
‘मोदी पंतप्रधान झाले आणि जम्मू-काश्मिरची स्थिती सुधारली’
” या घटनेतील पीडित महिला त्यावेळी शारीरिक, भावनिक आणि मानसिक आघाताने त्रस्त होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत होते त्यामुळे त्यांच्या तक्रारी नोंदवण्याच्या, जबाब नोंदवण्याच्या स्थितीत या महिला नव्हत्या. त्यामुळे या पीडित महिलांना पुन्हा त्यांच्या न्यायासाठी लढण्याची संधी द्यावी” आता या पत्राला राष्ट्रपती रामनाथ कोविंद काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.