नागपूर हिंसाचारातील मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर चालणार बुलडोझर?

अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नागपूर महानगर पालिकेने नोटीस बजावल्याची माहिती

नागपूर हिंसाचारातील मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर चालणार बुलडोझर?

नागपूर हिंसाचारातील मास्टरमाइंड म्हणून आरोप असलेला मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आता फहीम खान याच्या घरावर बुलडोझर कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. फहीम खान याने नागपूरच्या टेकानाका परिसरात घर बांधतांना काही भागात अतिक्रमण केल्यामुळे नागपूर महानगर पालिकेने त्याच्या कुटुंबाला नोटीस बजावली असल्याची माहिती माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळे लवकरच त्याच्या घरावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या फहीम खान याच्या घरावर बुलडोजर चालणार असल्याची शक्यता आहे. फहीम खान याने घराजवळ सुमारे ९०० चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने नोटीस बजावली असून बुलडोझर कारवाई होणार असल्याचे सांगितले जात आहे. शहरात लोकांच्या धार्मिक भावना भडकवून हिंसाचार घडवणे, त्यामुळे फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना अलीकडेच जिथे आवश्यक असेल तिथे बुलडोझर चालेल असे म्हटले होते.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदेंबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याने कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला!

समीर वानखेडे यांची एण्ट्री सालियन प्रकरणाला देणार नवे वळण

निवडून न येणारे विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात!

‘कीड़ा जडी’ – अनेक रोगांवर प्रभावी, किंमत ऐकून व्हाल थक्क!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फहीम खान हा नागपूर हिंसाचारातील मास्टरमाइंड आहे. हिंसाचाराच्या दिवशी फहीम खानने परिसरात जमाव जमावल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये फहीम खानचे नाव अधिकृतपणे समाविष्ट झाल्यानंतर काही तासांतच त्याला अटक करण्यात आली. आदल्या दिवशी पोलिसांनी त्याचे छायाचित्र आणि हिंसाचार सुरू होण्यापूर्वी खान कथितपणे प्रक्षोभक भाषण देत असल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. यामध्ये तो चिथावणीखोर भाषण देताना दिसत आहे. नागपूरमधील तणावाबाबत पोलिसांनी ५१ लोकांवर एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये फहीम शमीम खान याचे नाव आघाडीवर आहे. फहीम खाननेच सगळ्यातआधी सकाळी ११ वाजता ३० ते ४० जणांना जमा केले आणि पोलिसांना निवेदन देण्यास गेला. यावेळी विहिंप आणि बजरंग दल कार्यकर्त्यांविरोधात त्याने तक्रार पोलिसांकडे केली. यानुसार पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. मात्र, त्यानंतर देखील फहीम खानने पुन्हा जमाव एकत्र केला आणि तणाव निर्माण करण्यास सुरुवात केली. पोलीस हिंदु समाजाचे आहेत, आपली मदत ते करत नाही, असे सांगत फहीम खान आंदोलनकर्त्यांना भडकवत होता, अशी माहिती समोर आली आहे.

अनाथ, गरजवंताच्या पाठीवर डॉ. हेडगेवारांचा हात ! | Mahesh Vichare | Dhananjay Bhidey | RSS |

Exit mobile version