०१ एप्रिल २०१८ रोजी, अज्ञात इसमांकडून छोटेलाल मौर्य यांचा खून करण्यात आला होता. छोटेलाल मौर्य कांदा-बटाट्याच्या व्यवसायात होते आणि त्यांचे वेगवेगळ्या लोकांशी काही गैर संबंध असल्याने हा खून कोणी केला याबाबत निश्चित माहिती नव्हती. त्यामुळे त्यांच्या मुलगा रामजी मौर्य यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात तक्रार दाखल केली होती.
पोलिस तपासादरम्यान गुन्हेगार सापडला नाही, त्यामुळे पोलिसांनी संशयाच्या आधारावर छोटेलाल मौर्य यांची पत्नी धनुदेवी यांना अटक केली. अटक झाल्यानंतर माननीय सत्र न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले होते.
प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान, एकूण ७ साक्षीदारांच्या उलट तपासणी ॲड. अनुप कुमार पाल यांनी केली. या तपासणीदरम्यान, कोणत्याही साक्षीदाराने मयताच्या पत्नीविरोधात कुठलीही जबानी दिली नाही.
संपूर्ण सुनावणीच्या प्रक्रियेतही असे कोणतेही पुरावे समोर आले नाहीत की मयताचा खून त्याच्या पत्नीने केला आहे. बचाव पक्षाने असे असे मांडले की पोलिसांनी घरामध्ये चोरी झाली किंवा या अंगाने तपासच केला नाही परिसरामध्ये सीसीटीव्ही होते तरी देखील फुटेज चा अभ्यास केला नाही.
हे ही वाचा:
मध्य प्रदेशात पोलिसांच्या चकमकीत दोन महिला नक्षली ठार, एक महाराष्ट्रातील!
२०१० मध्ये लालूप्रसाद यादव वक्फ बोर्डसंबंधी काय म्हणाले होते? व्हिडीओ होतोय व्हायरल!
म्हणून सरकार ४०० पार हवे होते…
मातोश्रीवर वक्फ बोर्डाची करडी नजर पडेल तेव्हा बोला!
घरामध्ये फिंगर प्रिंट एक्सपर्ट ला बोलवून अन्य व्यक्ती येऊन गेल्याबद्दलचे पुरावे गोळा केले नाही. संशयाच्या आधारावर मयताच्या पत्नीला गुंतवले परंतु त्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद असल्याचे कोर्टासमोर सिद्ध होऊ शकले नाही.
यामुळे, संपूर्ण साक्षीदार तपासणीनंतर आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे बचाव पक्षाचे म्हणणे मान्य करून माननीय सत्र न्यायालयाने धनुदेवी यांना खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले आहे. अनुप पाल हे दर्द से हमदर्द तक ट्रस्ट या संस्थेचे स्वयंसेवक आहे. संस्थेने आतापर्यंत शेकडो लोकांना कायदेशीर मदत विनामूल्य दिली आहे.