21 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरक्राईमनामापतीच्या जेवणात जडीबुटी कालवली, पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल

पतीच्या जेवणात जडीबुटी कालवली, पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल

पीडित व्यक्ती सोन्याचा व्यापार करत असत.

Google News Follow

Related

पतीच्या जेवणात बंगाली बाबाची विषारी जडीबुटी मिसळून पतीच्या हत्येचा कट रचणाऱ्या पत्नीसह तीन जणांविरुद्ध मुंबईतील रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न आणि जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमेन राय (५६) असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. सोमेन राय हे सोन्याचे व्यापारी असून शिवडी येथे पत्नी आणि तीन मुलासह राहण्यास होते. पत्नीच्या छळाला कंटाळून दादर हिंदू कॉलनीत भाडेतत्वावर मागील काही वर्षांपासून राहत आहे. सोमेन यांची पत्नी प्रकृती राय ही पश्चिम बंगाल येथील औरंगाबाद या ठिकाणी असलेल्या एका बंगाली बाबाकडून विषारी जडीबुटी घेऊन ती जेवणात देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या कटात प्रकृती राय, तिची आई, बहीण आणि भाऊ सामील असल्याचे जवळच्या नातेवाईकांनी सोमेन यांना फोनवर सांगितले होते. तसेच पुरावा म्हणून पत्नीच्या आई आणि एका त्रयस्थ व्यक्तीची रेकॉर्डिंग पाठवली सोमेन यांना पाठविण्यात आली होती.

मागील काही वर्षांपासून सोमेन रॉय याची प्रकृती खालावत चालली होती, वारंवार आजारी पडत असल्यामुळे त्याने तपासणी केली असता त्याच्या संपूर्ण शरीरात इन्फेक्शन झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे सोमेन यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. विषारी जडीबुटीमुळेच आपल्याला हा त्रास होत असल्याचा दावा सोमेन याने तक्रारीत केला आहे.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री नाही तर मास्टरस्ट्रोकने ठाकरेंना घरी बसवणारे मास्टर

हिंदुत्व, फोडाफोडीचे राजकारण यावरून उद्धव ठाकरेंचे टोमणे

९ ऑगस्टला शहाजी महाराजांवरील टपाल तिकिटाचे प्रकाशन

राहुलना पुन्हा खासदारकी मिळण्याबद्दल काँग्रेसमध्ये चिंता!

दरम्यान पत्नीने सोमेन याच्या पश्चात बँकेतील लॉकर मधून २ किलो सोन्याचे दागिने आणि काही रोकड परस्पर चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी सोमेन राय याच्या पत्नीसह तीन जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न, कट रचणे, गुंगीचे औषध देणे, धमकी देणे आणि जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसानी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा