26 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरक्राईमनामाप्रियकराच्या मदतीने पत्नीने घरातच पुरला पतीचा मृतदेह

प्रियकराच्या मदतीने पत्नीने घरातच पुरला पतीचा मृतदेह

Google News Follow

Related

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून मृतदेह घरातील स्वयंपाक घरात गाडल्याची धक्कादायक घटना मुंबईतील दहिसर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. प्रेमाच्या आड येत असल्यामुळे पतीची हत्या केल्याची कबुली पत्नीने पोलिसांना दिली आहे.

शाहीदा शेख (२८) आणि अमित विश्वकर्मा (३०) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. शाहिदा शेख ही पती रईस शेख आणि दोन मुलांसह दहिसर येथील रावळपाडा येथे भाड्याच्या घरात राहण्यास होती. रईस शेख हा अंधेरी येथील एका कपड्याच्या दुकानात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.

२१ मे रोजी पती हा कामावरून घरी परतला नाही, अशी तक्रार शाहीदा हिने दहिसर पोलीस ठाण्यात २५ मे रोजी दिली होती. रईस याचा लहान भाऊ हा काही महिन्यापूर्वी गावी गेला होता. भाऊ बेपत्ता झाल्याचे कळताच तो गावाहून मुंबईत आला होता. दरम्यान नमाज पढताना त्याला घराच्या स्वयंपाक घरातील एक लादी वेगळी वाटत असल्यामुळे त्याने शाहिदा कडे लादी बदललेली आहे का, अशी चौकशी केली असता तिने नाही म्हणून सांगितले होते.

हे ही वाचा:

भातखळकरांनी ऑफर नाकारल्यामुळे राज ठाकरे यांची चरफड

दुकाने उघडल्यामुळे आला व्यापाऱ्यांच्या जीवात जीव

तेजपाल निर्दोषप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी

गृहमंत्र्यांनी स्वत: अदर पुनावालांना सुरक्षेची हमी द्यावी- न्यायालयाचे निर्देश

मात्र त्याला त्या दिवसापासून संशय येऊ लागल्यामुळे त्याने दहिसर पोलीसाना संशय बोलून दाखवला. दरम्यान दहिसर पोलीसानी या संशयावरून तपास सुरू केला असता त्यांना आजूबाजूच्या लोकांकडून शाहिदाच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली, तसेच २१ मे रोजी शाहिदाच्या घरात रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच मंगळवारी दुपारी पोलिसांनी घरातील एकेक करून लादी बाहेर काढली असता आतून कुबट वास येऊ लागल्याने पोलिसांचा संशय खरा ठरला आणि काही वेळातच पोलिसांनी सर्व लाद्या बाहेर काढून आतून एक गोणी बाहेर काढली असता त्यात रइस याचा कुजलेला मृतदेह मिळून आला.

याप्रकरणी पोलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून शाहिदा आणि तिच्या प्रियकराला अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत रईस ला आमच्या प्रेमप्रकरणाबाबत कळले होते. त्याचा काटा काढण्यासाठी २१ मे रोजी रईस याला झोपेच्या गोळ्या देऊन मध्यरात्री २ वाजता त्याची गळा आवळून हत्या केली आणि जमिनीत पाच फूट खड्डा खोदून त्यात त्याचा मृतदेह पुरल्याची कबुली दोघांनी दिली. त्याच्या हत्येचा कट मागील महिन्याभरापासून रचण्यात आला होता. रईसला दोन वेळा मारण्याच्या प्रयत्न केला होता, मात्र दोन्ही वेळा तो सावध असल्यामुळे या दोघांचा कट उधळला गेला होता अशी माहिती समोर आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा