24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाव्याजाच्या रकमेसाठी घरात घुसून विधवा महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न

व्याजाच्या रकमेसाठी घरात घुसून विधवा महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न

सावकाराविरोधात गुन्हा दाखल; एकाला अटक

Google News Follow

Related

मुलुंड पूर्व येथे सावकारी जाचाला त्रासलेल्या दोन जणांनी दोन वेगवेगळ्या सावकारांच्या विरोधात नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका घटनेत एका विधवेला १५ हजार रुपये व्याजाने देणाऱ्या सावकाराने कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी विधवेच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या घटनेत सावकाराने कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

 

नवघर पोलिसांनी या दोन्ही घटनाप्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून एका सावकाराला अटक करण्यात आली आहे.
मुलुंड पूर्व येथील एका व्यापाऱ्याने व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेतले होते, कर्जाचे व्याज नियमित देणाऱ्या या व्यापाऱ्याला व्यवसायात नुकसान झाल्यामुळे त्याचे काही महिन्याचे व्याज थकले होते.व्यापाऱ्याने सावकाराकडून मुदत मागितली होती. परंतु सावकाराने दुकानात येऊन गल्ल्यातील पैसे काढून उर्वरित व्याजाची रक्कम लवकर दे अन्यथा बघून घेईन, अशी धमकी दिली. याप्रकरणी नवघर पोलिसांनी दोन सावकारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

दुसऱ्या घटनेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पतीचे २०२० मध्ये कोविड-१९ साथीच्या आजारा दरम्यान मृत्यू झाला आणि तेव्हापासून तो तिच्या १६ वर्षांच्या मुलासोबत राहत आहे. ती कांजूरमार्ग येथील एका हायपरमार्केटमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. २०२२ मध्ये, तिला मुलुंड पूर्व येथील म्हाडा कॉलनी येथे राहण्यासाठी भाड्याने घ्यायचे होते आणि त्यासाठी तिला १५हजार रुपयांची गरज होती, घराचा करार करण्याची अंतिम तारीख असल्यामुळे तीला पैशांची तातडीची गरज होती. ती विजय जनार्दन खामकर नावाच्या सावकाराकडे गेली व तीने त्यांच्याकडून १० टक्के मासिक दराने १५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.

 

काही महिन्यांनी पीडित महिलेने सावकार खामकर याचे घेतलेले कर्ज व्याजासह परत करून देखील सावकार खामकर हा पीडित महिलेकडे आणखी पैशांची मागणी करीत होता. शुक्रवारी सकाळी पीडित महिला घरी एकटी असताना खामकर हा तिच्या घरी आला. त्यावेळी पीडिता ही बाथरूममध्ये कपडे धुत असताना खामकर याने घरात घुसून तिला मागून मिठी मारली. तिने प्रतिकार केल्यावर त्याने तिचा गळा पकडून तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्यास सुरुवात केली. पीडितेने त्याला विरोध करताच त्याने व्याजाचे पैशांची मागणी करून पुन्हा अंगलट करू लागला, पीडितेने स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला मात्र खामकर अधिकच चेकाळला आणि त्याने पीडितेचा गाऊन खेचून तीला मारहाण करून त्याने घरातून पळ काढला असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

मुलगा घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार मुलाला सांगितला व दोघे नवघर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. नवघर पोलिसांनी खामकर यांच्यावर ४५२ (दुखापत, हल्ला किंवा चुकीच्या पद्धतीने आवर घालण्याची तयारी केल्यानंतर घरामध्ये घुसखोरी करणे), ३५४(ब) ( विनयभंग करून मारहाण करणे किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे), ३२३ (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), ५०४ (हेतूपूर्वक अपमान करणे) ५०६(गुन्हेगारी धमकी) आणि ५०९ (अश्लीला हावभाव, एखाद्या महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतूने केलेले कृत्य), आणि कलम ३९ (वैध परवान्याशिवाय सावकारी करणे) आणि महाराष्ट्र मनी-च्या इतर कर्ज (नियमन) अधिनियम, २०१४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून खामकर याला अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम गिरप यांच्या म्हणण्यानुसार, सपोनि. सतीश पाटील यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी देण्यात आली होती – त्यांनी त्याच दिवशी खामकरला अटक केली. खामकरने गरजूंना कर्ज देऊन नंतर व्याजदराच्या बहाण्याने जादा रकमेची मागणी केल्याच्या यापूर्वी देखील तक्रारी आलेल्या आहेत.

हे ही वाचा:

अमेरिकेतील भारतीय राजदूताला खलिस्तानी समर्थकांची धक्काबुक्की!

खलिस्तानी दहशतवादी अर्शदीपच्या दोन शूटर्सला ठोकल्या बेड्या

उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या मदतीला कोल इंडिया

मोहम्मद शमीने नैनितालमध्ये प्रवाशांचे वाचवले प्राण!

 

या प्रकरणात, पीडितेने तिने घेतलेली रक्कम आधीच परत केली आहे, ती परत करू शकत नाही हे त्याला माहीत असताना त्याने तिचा लैंगिक छळ केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मुलुंड पूर्वेकडील म्हाडा कॉलनीत राहणारा खामकर हा एका राजकीय पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता असून तो राजकीय बळाचा वापर करून गरजवंतांना कर्ज दिल्यानंतर बळजबरीने दुप्पट वसुली करीत असल्याचा आरोप खामकर याच्यावर आहे.
खामकर याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्या तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात असल्याची माहिती पोलिसानी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा