परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतच्या याचिकेवर सुनावणीला सुरूवात झाली. या याचिकेत अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.
न्यायालयाने अनिल देशमुखांवरच्या सर्व याचिकांना एकत्र करून याबाबतची सुनावणी १ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. यापुर्वीच्या अनिल देशमुखांवरील याचिकांच्या विविध सुनावणी न्यायमुर्ती शिंदे यांच्या न्यायालयाच्या खंडपीठासमोर झाल्या
मंगळवारी परमबीर सिंह यांच्या अनिल देशमुखांवर यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरील याचिकेच्या सुनावणीला सुरूवात झाली. ही सुनावणी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर घेतली जाणार आहे. त्यामुळेच यापूर्वीच्या याचिकांनादेखील परमबीर सिंह यांच्या याचिकेसोबत जोडून घेण्यात आले आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेला ‘हिंदुहृदयसम्राटांचा’ विसर….नावे फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची
ममतांवर ‘गोत्र’ सांगण्याची वेळ
ममता बॅनर्जींच्या उलट्या बोंबा
यावेळी सरकारच्या बाजूने महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली, तर परमबीर सिंह यांची बाजू वरिष्ठ विधीज्ञ विक्रम नानकानी यांनी मांडली. यावेळी कुंभकोणी असा युक्तिवाद केला, की ही जनहित याचिका होऊ शकत नाही. ही याचिकाच वैयक्तिक सुडबुद्धीने दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे ही जनहित याचिका असू शकत नाही.
त्यानंतर न्यायालयाने, एफआयआर नसताना सीबीआय तपासणीचे आदेश कसे देणार? असा सवाल उपस्थित केला. त्याबरोबरच आयुक्त असताना एफआयआर दाखल का केला नाही? इतक्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तिला सीआरपीसी माहित नाही का? असा सवाल देखील न्यायल्याने केला.