मिरा रोडमध्ये राहणाऱ्या मनोज साने याने त्याच्या लिव्ह इन पार्टनरची निर्घृण हत्या केल्याने चांगलीच खळबळ उडाली. मात्र, सरस्वती हिची हत्या केली नसून तिने आत्महत्या केल्याचे मनोज याने सांगितले. त्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.
चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितले की, सरस्वती वैद्य हिने ३ जून रोजीच आत्महत्या केली. त्यानंतर आपल्यावर तिच्या हत्येचा आरोप होईल याची त्याला भीती वाटत होती, म्हणून त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. दुर्गंधी टाळण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये उकळल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्याने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याला या सर्वाबद्दल कसलाही पश्चात्ताप होत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
अधिकचा तपास सुरू असून घरात सापडलेल्या मृतदेहाचे तुकडे पोस्टमॉर्टमसाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. आरोपीच्या आत्महत्येच्या दाव्याबद्दल शंका असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
सरस्वतीने विष घेऊन आत्महत्या केली. सरस्वतीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे दोघात वाद होत होता. ज्या दिवशी ही घटना घडली. त्या दिवशीही आमच्यात भांडणं झाली. त्यानंतर सरस्वतीने घरी येऊन विष घेऊन आत्महत्या केली. सरस्वतीने अशा पद्धतीने आत्महत्या केल्याने घाबरून गेलो होतो. त्यामुळेच तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लान तयार केला, अशी माहिती मनोज याने दिली.
हे ही वाचा:
अमेरिकेतील सभांमध्ये राहुल गांधींच्याभोवती जिहादीं गटांचे कोंडाळे
पालखी सोहळ्यातल्या वारकऱ्यांना कागदी घोड्यांचा फटका
कुस्ती महासंघाच्या निवडणुका ३० जूनपर्यंत; क्रीडामंत्र्यांनी दिले आश्वासन
पुण्यातील ३९ गृहप्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर!!
मीरा- भाईंदर येथे मनोज आणि सरस्वती मागच्या तीन वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहायचे. त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलीस ठाण्यात माहिती देऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.