दिल्लीतील रोहिणी न्यायालयाच्या आवारात गोळीबार झाल्याने किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर जितेंदर उर्फ गोगीला हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले आहे. मारल्या गेलेल्या इतरांपैकी वकिलांचे कपडे घातलेल्या दोन हल्लेखोरांना न्यायालयाच्या आत गोळ्या घालून ठार करण्यात आले. असे दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने सांगितले.
जितेंदरला न्यायाधीशांसमोर हजर केले असता रोहिणी न्यायालय क्रमांक २ मध्ये ही घटना घडली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पुढील गोळीबारात दोन्ही हल्लेखोरांना ठार केले. हल्लेखोर टिल्लू ताजपुरीया टोळीतील असल्याचे समजते. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आणि एक महिला वकील जखमी झाली. या घटनेदरम्यान सुमारे ३५-४० राउंड फायर करण्यात आले.
हे ही वाचा:
भारताशी संबंध दृढ करण्यातच अमेरिका आणि फ्रान्सचे हित
अमरिंदर, राष्ट्रवादी विचारांसोबत या, काँग्रेसचा डाव उलथवा!
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाची ‘या’ दोन पक्षांसोबत युती
मोदी सरकारच्या काळात अखेर लष्कराची पुनर्रचना होणार
जितेंदर आणि त्याचा सहकारी कुलदीप फज्जा, जो दिल्ली विद्यापीठात टॉपर होता, त्याला दोन वर्षांपूर्वी स्पेशल सेलने गुरुग्राम येथून अटक केली होती. कुलदीप फज्जा नंतर २५ मार्च रोजी कोठडीतून पळून गेला. जितेंदर गोगीच्या नेटवर्कमध्ये ५० पेक्षा जास्त लोक असल्याचे स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. २०२० मध्ये गोगीच्या अटकेदरम्यान मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि शस्त्रे जप्त करण्यात आली. एकट्या गोगीच्या माहितीसाठी दिल्लीमध्ये ४ लाख आणि हरियाणामध्ये २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.