23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामापरमबीर सिंह यांनी सायबर तज्ज्ञाला का दिले ५ लाख रुपये?

परमबीर सिंह यांनी सायबर तज्ज्ञाला का दिले ५ लाख रुपये?

Google News Follow

Related

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाखल केलेल्या एका चार्जशीटमध्ये एजन्सीमधील एका सायबर एक्सपर्टनं धक्कादायक माहिती दिली आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अँटिलीया प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी जैश उल हिन्द नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात छेडछाड केली असल्याचा दावा एक्सपर्टनं केला आहे. यासाठी  परमबीर सिंह यांनी सायबर एक्सपर्टला पाच लाखांची लाच दिली असल्याचंही त्यानं सांगितलं आहे.

सायबर एक्सपर्टनं एनआयएला आपला जबाब दिला होता. ज्यामध्ये सायबर एक्सपर्टनं सांगितलं की, अँटिलिया घटनेनंतर ‘जैश-उल-हिंद’ या अतिरेकी संघटनेनं या घटनेची जबाबदारी स्वीकारली, असे त्यांना त्यांच्या अहवालात लिहिण्यास सांगितले होते. त्यासाठी दिल्लीत इस्रायल दूतावासासमोर स्फोट झाल्यानंतर टेलिग्राम चॅनेलचा वापर करण्यात आला.

तपास यंत्रणेला सुरुवातीपासूनच अँटिलीया प्रकरणात समोर आलेल्या जैश उल हिन्दच्या षडयंत्रात परमबीर सिंह यांचा सहभाग असल्याता संशय आहे. मात्र त्यांनी आपल्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंह यांचा रोल काय आहे याबाबत काही लिहिलेलं नाही. मात्र आता सायबर एक्सपर्टनं परमबीर यांचं नाव घेतलं आहे.

एआयएनं या सायबर एक्सपर्टचा जबाब ५ ऑगस्टला नोंदवला होता. त्यानं सांगितलं की, तो अनेक आयपीएसला सायबरशी संबंधित ट्रेनिंग देतो. सोबतच काही इंटेलिजेंस एजन्सी सोबतही काम करतो. ९ मार्च २०२१ रोजी मी मुंबई पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात ट्रेनिंग संबंधी चर्चेसाठी गेलो होतो.

हे ही वाचा:

शिवसेनेला मराठी माणसाचा एवढा आकस का?

अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू होणार

संयुक्त राष्ट्राने अतिरेकी घोषित केले, आता होणार तालिबानचे मंत्री

बेस्टच्या बदललेल्या मार्गिकांमुळे बेस्ट समितीत वादळ

परमबीर सिंह मला यानंतर म्हणाले की, तुम्ही खूपच भारी काम केलंय. यामुळं मी तुम्हाला पैसे देऊ इच्छितो. त्यांनी मला किती पैसे घेणार असं विचारलं. त्यावर मी काही नको असं म्हटलं मात्र त्यांनी मला तुम्ही डिझर्व्ह करता असं म्हटलं आणि त्यांच्या पीएला बोलावून मला तीन लाख रुपये देण्याचं सांगितलं. पीए तिथून जात असताना त्यांनी त्याला पुन्हा बोलावून पाच लाख रुपए देण्याची सूचना केली. त्यांनी मला पाच लाख रुपए कॅश दिले असं सायबर एक्सपर्टनं सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा