महाराष्ट्रात ठाकरे सरकारच्या काळात न्याय अंधारात चाचपडताना दिसतो आहे. एकाला एक न्याय तर दुसऱ्याला वेगळाच अशी परिस्थिती असल्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये चिंता आहे. रवी राणा आणि नवनीत राणा यांना एकीकडे अटक केली जात असताना त्यांच्या घरावर हल्ला केलेल्या शिवसैनिकांना मात्र त्वरित दुसऱ्या दिवशी जामिनावर सोडण्यात आले आहे. अशीच परिस्थिती किरिट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याच्या बाबतही आहे. एकूणच राज्यात ये अंधा कानून है सारखेच चित्र दिसते आहे, असा आरोप लोक करू लागले आहेत.
खार पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या राणा दांपत्याला भेटून निघालेले असताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यांच्या गाडीच्या दिशेने दगड फेकण्यात आला आणि त्यात गाडीची काच फुटली तसेच त्यांच्या चेहऱ्याला जखम झाली. या प्रकरणात माजी महापौर महाडेश्वर यांच्यासह तीन नगरसेवकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह तीन नगरसेवकही अटकेत आहेत. हाजी आलम खान, शेखर वांगणकर, दिनेश कुबल यांचा त्यात समावेश आहे. किरीट सोमय्या यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यासंदर्भात तिघांना अटक करण्यात आली आणि नंतर त्यांना जामीनही मिळाला. एक दिवसानंतरच त्या सगळ्यांना जामीन मिळाला.
तिकडे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा करणाऱ्या राणा यांना मात्र त्यांच्या घराबाहेर न पडताही अटक करण्यात आली तसेच राजद्रोहाचा गुन्हा, जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोपही ठेवण्यात आला. त्यानंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी.
हे ही वाचा:
कांडला बंदर हेरॉईन प्रकरणातील आयातदाराला अटक
राणांच्या घरात घुसू पाहणाऱ्या शिवसैनिकांना एका दिवसात जामीन
जातीवरून हिणवत छळ केल्याचा नवनीत राणांचा आरोप
८ एप्रिलला शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर एसटी कर्मचारी चालून गेले होते. त्यांनी चप्पलफेक, दगडफेक केली. त्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. १०० पेक्षा अधिक कर्मचारी ताब्यात घेण्यात आले. त्यांनी २२ एप्रिलला जामीन मंजूर झाला. त्यासाठी प्रत्येकी १० रुपये इतका दंड भरण्यास सांगण्यात आले.
पण खार येथील राणा यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न ज्या शिवसैनिकांनी केला, त्यातून १६ शिवसैनिकांना अटक आणि नंतर लगेच दुसऱ्या दिवशी सुटका.