कुठे गेली पाकिस्तानमधून आलेली अंजू? मुलांनीही भेटण्यास दिला नकार

कुठे गेली पाकिस्तानमधून आलेली अंजू? मुलांनीही भेटण्यास दिला नकार

पाकिस्तानमधील फेसबुक फ्रेंड नसरुल्लाकडे गेलेली आणि तिथून आपल्या मुलांना भेटण्यासाठी आलेली अंजू ना भिवाडी पोहोचली असून ना स्वतःच्या वडिलांच्या घरी गेली आहे. त्यामुळे अंजू गायब झाली तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भिवाडीमध्ये राहणारा तिचा पती अरविंदने तर तो आणि त्याची मुले तिला भेटण्यास तयार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

भिवाडीतील सोसायटीमध्येही तिला प्रवेश दिला जाणार नाही. या संदर्भात आयबी या तपास संस्थेने अंजूची मुले आणि पतीशी चर्चा केली. भिवाडीतील सोसायटीमध्ये सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व गाड्यांची तपासणी केली जात आहे.

फेसबुकवर ओळख झालेला नसरुल्ला याच्याजवळ गेलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारून त्याच्याशी निकाह केला आहे. आता तिचे नाव फातिमा झाले आहे. आता पाच महिन्यांनंतर स्वतःच्या मुलांना भेटण्यासाठी ती भारतात आली आहे. मात्र दिल्ली विमानतळावर उतरल्यापासून अंजू गायब आहे. ना ती मुलांजवळ पोहोचली ना वडिलांच्या घऱी गेली. मात्र तिचा पती अरविंद आणि मुलांनी तिला भेटण्यास नकार दिला आहे. मुलांनीही तिला सोसायटीत घेऊ नये, असे सांगितले आहे.

हे ही वाचा:

विजेचे बिल होते चार हजार रुपये; जमा झाले १९७ कोटी!

हवामान बदल शिखर परिषदेसाठी मोदी दुबईत!

‘बोगद्यातून सुटका झालेले सर्व कामगार तंदुरुस्त’

राजस्थान, मध्य प्रदेशात भाजप; तेलंगणात बीआरएसपेक्षा काँग्रेस सरस

या पार्श्वभूमीवर सोसायटीची सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे. कोणालाही अरविंदच्या घरी जाण्याची मुभा नाही. त्यानंतर आयबीच्या अधिकाऱ्यांनी अरविंदसोबत तसेच, त्यांची १५वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांच्या मुलासोबत चर्चा केली. अंजूवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अंजू जर भिवाडीमध्ये आली तर तिचीही चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर तिच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version