अमृतपाल फरार झाला; मग ८० हजार पोलीस काय करत होते ?

उच्च न्यायालयाने पंजाब पोलिसांना विचारला प्रश्न आणि त्यांचे उत्तर मात्र अचंबित करणारे होते

अमृतपाल फरार झाला; मग ८० हजार पोलीस काय करत होते ?

अमृतसर जिल्ह्यातील जल्लूपुर खेड गावचा अमृतपालसिंग हा एक ट्रक चालक आहे. २०१२ मध्ये तो नोकरी निमित्ताने दुबईला गेला आणि नंतर तो तिकडून परतलाच नाही. आता तो दीप सिद्धू च्या ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख असून खलिस्तान समर्थक आहे. पंजाब पोलीस अजूनही खलिस्तान समर्थक अमृतपालसिंग याला अटक करू शकले नाहीत. नंतर हे प्रकरण  पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पोचले. तेव्हा न्यायालयाने पोलिसांना प्रश्न केला कि, अमृतपालसिगचे साथीदार पकडले जाऊ शकतात तर अमृतपालसिंग कसा सुटतो तेव्हा, पोलिसांनी कोर्टात आश्चर्यकारक उत्तर दिले आहे.

पंजाब पोलिसांनी सांगितले कि, अमृतपालसिंग वर एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तर न्यायालयाने यावर म्हंटले कि, पंजाब पोलिसांची गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली आहे. न्यायमूर्ती एन. एस. शेखावत यांनी सरकारतर्फे उपस्थित ऍटर्नी जनरल विनोद घई यांना विचारले कि, अमृतपाल सिंग यांच्यावर एनएसए का लावण्यात आले. जर का पोलिसांनी कारवाई करण्याची योजना आखली होती तर त्याच्या साथीदारांना अटक केली असताना अमृतपालसिंग पळून कसा काय गेला? त्यावर न्यायालयाने पोलिसांच्या या कथेवर विश्वास ठेवत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

राज्यात अखेर गो आयोगाची स्थापना

‘खलिस्तानी चळवळीला लंडनमधील शीख समुदायाने नाकारले आहे!’

नेरुळ येथे बांधकाम व्यावसायिकाला गोळ्या घालणारे सापडले बिहारमध्ये

रवींद्र वायकर सुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

दरम्यान, पंजाब सरकारच्या वतीने ऍटर्नी जनरल विनोद घई यांनी सांगितले कि, पोलिसांकडे शस्त्रे असूनसुद्धा त्यांना बळाचा  वापर करण्यापासून थांबवण्यात आले. काही प्रकरणे अशी आहेत कि, आम्ही न्यायालयात स्पष्टीकरण देऊ शकत नाही. त्यांच्या या उत्तरावर सर्वानीच आश्चर्य व्यक्त केले आहे. न्यायमूर्ती एन. एस. शेखावत यांनी सांगितले कि, अमृतपालसिग एवढ्या मोठ्या सुरक्षे दरम्यान पळून गेला असेल तर ते गुप्तचर यंत्रणेचे अपयशच आहे.

Exit mobile version