आर्यन खानचे व्हॉट्सअप चॅट आले समोर

आर्यन खानचे व्हॉट्सअप चॅट आले समोर

शाहरुख खान पुत्र आर्यनच्या मोबाईल मध्ये काही फोटो सापडले आहेत.  त्याबाबत तपास सुरू असून आर्यन एका व्हाट्सएप ग्रुपवर जोडला गेला होता. त्या ग्रुपमधील मोबाईल क्रमांक आर्यनच्या मोबाईल मध्ये सेव्ह नव्हते, त्यामुळे हे सर्व कोण आहेत  व ते व्हाट्सअपवर कोडवर्ड टाकून चॅट करत असत. आर्यन खान हा पैसे कश्याच्या माध्यमातून द्यायचे हे विचारताना या चॅटमध्ये दिसतो आहे, असेही एनसीबीने म्हटले आहे.

आर्यन खानसाठी सतीश मानेशिंदे यांनी बाजू लढविली. ते म्हणाले की, व्हाट्सए चॅट आर्यनच्या कस्टडीसाठी पुरेसे नाहीत. त्याच्याकडे काही सापडलं आहे का?

आर्यन खान आणि आणखी एक साथीदार अरबाझ मर्चंट एकत्र होते, याचा अर्थ त्यांच्यात साम्य आहे असं नाही, असेही मानेशिंदे म्हणाले. या प्रकरणात आर्यनची गुन्हेगारी वृत्ती दिसत नाही. शिवाय, एनसीबी अधिकाऱ्यांना पाहून तो पळाला नाही. अधिकाऱ्यांना त्याने पूर्ण सहकार्य केले. त्याची तपासणी करताना अडथळा आणला नाही. त्यामुळे फक्त चॅटिंगचा संदर्भ घेऊन तर्क लावू नयेत. म्हणूनच आर्यनला पुन्हा एनसीबी कोठडी देऊ नये.

आर्यन या चॅटमध्ये पैशांच्या व्यवहारासंदर्भात बोलताना दिसतोय, असे एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी न्यायालयात सांगितले. अनिल सिंग यांनी २०२० मधील आर्यनचे व्हाट्सप चॅट न्यायालयात सादर केले. त्यात तो कोडवर्ड्समध्ये बोलताना दिसत आहे.

 

हे ही वाचा:

भारताचा दोहा कराराला विरोध?

गीतकार जावेद अख्तरविरुद्ध गुन्हा दाखल

त्या रेव्ह पार्टीमध्ये होता एका बड्या नेत्याचा मुलगा?

कृषी कायद्यांना स्थिगिती दिल्यानंतर तुम्ही कशाचा विरोध करताय?

 

त्यावर न्यायालयाने एनसीबीच्या वकिलांना विचारले की, या चॅटिंगवरून काय सिद्ध करू पाहताय? त्यावर वकील अनिल सिंग म्हणाले की, आर्यन ड्रग्ससंदर्भात लोकांच्या संपर्कात होता. त्यामुळे तो निर्दोष नाही. चॅटिंगमध्ये तो अनोळखी लोकांशी ड्रग्स आणि त्यासंबंधित पैशांच्या व्यवहाराशी बोलताना दिसत आहे. दोन दिवसांत आम्ही तपास पूर्ण कसा करणार. त्यामुळे आम्हाला कोठडी वाढवून द्यावी. सगळे धागेदोरे आम्हाला शोधून काढायचे आहेत.

आर्यन ज्या लोकांच्या नियमित संपर्कात होता, त्यांच्या सोबत तो क्रूझवर गेला. त्यांच्याकडे ड्रग्स सापडले आहे.

Exit mobile version