27 C
Mumbai
Wednesday, May 7, 2025
घरक्राईमनामा१० हजारांचा जमाव, प्रचंड जाळपोळ, पोलिसांवर हल्ले, हिंदू कुटूंब हेच लक्ष्य... मुर्शीदाबादेचे...

१० हजारांचा जमाव, प्रचंड जाळपोळ, पोलिसांवर हल्ले, हिंदू कुटूंब हेच लक्ष्य… मुर्शीदाबादेचे भयावह वास्तव आले समोर

८, ११, १२ एप्रिल या तीन दिवशी झालेल्या हिंसाचार आणि विध्वंसाची अहवालात माहिती

Google News Follow

Related

देशाच्या संसदेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर होऊन राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रुपांतर झाले. याचं कायद्याच्या निषेधार्थ पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार उसळला. हिंदूंना लक्ष्य करण्यात आले शिवाय त्यांच्या मालमत्तांचे नुकसान करण्यात आले. अनेक हिंदू कुटुंबे स्थलांतरित झाली. यावरून पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल सरकारवर ताशेरे ओढण्यात येत आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. सरकार आणि राज्य पोलिसांच्या नाकर्तेपणाला दोष दिला जात असताना आता पश्चिम बंगाल सरकारने मुर्शिदाबाद हिंसाचाराचा अहवाल कोलकाता उच्च न्यायालयात सादर केला आहे. या अहवालात ८ एप्रिल, ११ एप्रिल आणि १२ एप्रिल या तीन दिवशी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील काही भागात झालेल्या हिंसाचार आणि विध्वंसाची माहिती देण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती इतकी बिघडली की, या परिसरात केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) तैनात करावी लागली. तेव्हा परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली.

अहवालानुसार, ८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजता रघुनाथगंज पोलिस स्टेशन अखत्यारीत येणाऱ्या पीडब्ल्यूडी ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाले. सुमारे आठ हजार ते १० हजार लोकांचा जमाव एकत्र आला होता. यापैकी सुमारे चार हजार ते पाच हजार लोक उमरपूरकडे निघाले. त्यांनी दुपारी ३ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग रोखला. यानंतर रघुनाथगंज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि एसडीपीओ जांगीपूर यांनी या गर्दीला पांगवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. या रोखलेल्या वाहतुकीमध्ये रुग्णवाहिका, शाळेच्या बसेस आणि सार्वजनिक वाहतूक समाविष्ट होती. मात्र, पोलिसांना न जुमानता या जमावाने सूचनांचे पालन करण्यास नकार दिला.

दुपारी ४:२५ वाजता, जमाव हिंसक झाला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. शिवाय विटा, दगड, लाठ्या, लोखंडी रॉड आणि इतर प्राणघातक शस्त्रांनी पोलिसांवर हल्ला केला. एसडीपीओ जांगीपूर यांचे ग्लॉक पिस्तूल (बटण क्रमांक जेपीडी २, १० राउंड भरलेले) हल्लेखोरांनी हिसकावून घेतले. जमावाने सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केली आणि एका सरकारी वाहनाला आग लावली.

अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या गोळ्या (TSM) आणि एक TSM LR च्या दोन राउंड गोळीबार केला. सुमारे चार तासांनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, जमाव रघुनाथगंज शहराकडे परतत असताना, ते फुलताळा मोरे येथे पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी वाहतूक चौक्या, संरक्षक कठड्यांसह पायाभूत सुविधांची तोडफोड केली आणि जाळपोळही केली. एकूणच परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी, पोलिसांनी पीएजीच्या १४२ फेऱ्या, टीएसएमच्या १० फेऱ्या, ४० स्टन शेल्स, ९ हातबॉम्ब आणि १४ अश्रुधुराचे ग्रेनेड वापरले. या घटनेनंतर, जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी रघुनाथगंज आणि सुती पीस भागात बीएनएसएस, २०२३ चा आदेश १६३ जारी केला. ११ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत व्हीओआयपीसह इंटरनेट सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या.

पुढे अहवालात असे म्हटले आहे की, जिल्हा गुप्तचर शाखेच्या गुप्तचर यंत्रणेने ११ एप्रिल रोजी जुम्माच्या नमाजानंतर उमरपूर (रघुनाथगंज पोलिस ठाणे), सजूर मोरे (सुती पोलिस ठाणे) आणि जुना डाकबंगला मोरे (समशेरगंज पोलिस ठाणे) अशा अनेक ठिकाणी निषेध नोंदवण्याची शक्यता दर्शविली होती. त्यानुसार, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सजूर मोरे येथे हिंसक जमावाने न्यू डाकबंगला मोरे जवळ राष्ट्रीय महामार्ग रोखला, ज्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा जमाव हिंसक झाला, त्यात किमान १० अधिकारी जखमी झाले आणि सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करण्यात आली. अश्रूधुराचा वापर करूनही परिस्थिती आणखी बिकट झाली आणि पोलिसांना माघार घ्यावी लागली. हिंसाचार नंतर धुलियान शहरात पसरला, जिथे अनेक दुकाने, मंदिरे आणि घरे लुटण्यात आली आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. त्याच वेळी, दुपारी २:३० च्या सुमारास, समशेरगंज पोलीस ठाण्यातील जुना डाकबंगला मोरे येथे चार हजार ते पाच हजार लोकांचा जमाव जमला आणि त्यांनी निदर्शने सुरू केली. पुढे त्यांनी धुलियानचा मुख्य रस्ता आणि राष्ट्रीय महामार्ग रोखला. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना न जुमानता जमाव अधिकाधिक हिंसक झाला. दगडफेक करण्यात आली आणि जवळच्या इमारतींची तोडफोड करण्यात आली आणि आगही लावण्यात आली, त्यात दहा अधिकारी जखमी झाले. मालदाचे एसपी आणि अतिरिक्त एसपी यांच्या नेतृत्वाखालील पथके आली आणि त्यांनी बळाचा वापर केला. चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर, महामार्ग मोकळा झाला आणि सुव्यवस्था पूर्ववत झाली.

पुढे, १२ एप्रिल रोजी समशेरगंज पोलीस ठाण्यातील कांचनतला मशिदीजवळ पुन्हा हिंसाचार उसळला, जिथे एका संतप्त जमावाने घोषणा देत हिंदूंच्या निवासस्थानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. उपअधीक्षक (वाहतूक) आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण मालदा) यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस दलावर दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करण्यात आला. धुलियान टाउनमधील हॉस्पिटल मोरे आणि वॉर्ड क्रमांक ५ मध्येही हिंसाचार झाला. जांगीपूर पोलिस जिल्ह्याचे एसपी आणि कुर्सियांगचे अतिरिक्त एसपी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर केला. रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) चे पंधरा कर्मचारी आणि एक पोलिस अधिकारी धरपकड करण्यासाठी तैनात होते.

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाला तैनात करण्याचे कारणही अहवालात स्पष्टपणे दिले आहे. अहवालात म्हटले आहे की, एकाच वेळी अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळून येत असल्याने आणि परिस्थिती वेगाने बिघडत चालली असल्याने, जांगीपूर पीडीच्या एसपींनी ११ एप्रिल रोजी दुपारी पश्चिम बंगालच्या डीजीपी आणि आयजीपीशी संपर्क साधून सीएपीएफ तैनात करण्याची विनंती केली. त्यानुसार, सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी दुपारी १ वाजेपर्यंत सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या. संध्याकाळपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आली होती. पोलिसांनी परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे मान्य केले. परिणामी, हिंसाचाराच्या संदर्भात ६० एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी अहवालात असेही नमूद केले आहे की त्यांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला.

हे ही वाचा  : 

नाशिक दंगल प्रकरणी एमआयएमचे शहराध्यक्ष मुख्तार शेख यांना अटक!!

भारतात डिझाईन केलेला एआय सर्व्हर ‘आदिपोली’!

रशियाने युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीच्या गोदामावर क्षेपणास्त्र टाकले?, दूतावासाने दिले उत्तर!

पंतप्रधान मोदींचा एलोन मस्क यांना फोन; कोणत्या विषयांवर केली चर्चा?

डीजीपी आणि आयजीपी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहेत आणि बाधित भागांना भेट देत आहेत. संवेदनशील भागात रूट मार्च काढले जात आहेत. अफवांना आळा घालण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी लाऊडस्पीकरवरून घोषणा दिल्या जात आहेत. आतापर्यंत, हिंसाचारात घर सोडून पळून गेलेल्या ३८ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे आणि त्यांना सुरक्षा आणि मदत पुरवली जात आहे. सतत दक्षतेसाठी परिसरात CAPF कॅम्पची स्थापना करण्यात आली आहे. समशेरगंज पोलीस ठाण्यातील हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या १६० व्यक्तींना १०,००० रुपयांची अंतरिम मदत वितरित करण्यात आली आहे. अहवालात असे नमूद केले आहे की बाधित भागात सामान्य परिस्थिती परत येण्यासाठी आणखी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
246,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा