दिशा सालीयनच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाच्या गोष्टी आल्या समोर

दिशा सालीयन मृत्यू प्रकरणावर काय पडणार प्रभाव?

दिशा सालीयनच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाच्या गोष्टी आल्या समोर

दिशा सालियनची हत्या झाली होती की आत्महत्या याविषयी जवळपास साडेचार वर्षे लोटली तरी उत्तर सापडलेले नाही. आता याबाबतचा तेव्हाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यात महत्त्वाची माहिती नमूद असल्याचे दिसते आहे.

या अहवालात म्हटल्याप्रमाणे दिशाच्या मृत्यूचे कारण डोक्याला गंभीर इजा असल्याचे म्हटले आहे तर तिच्या शरीरावरही जखमा असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद आहे.

दिशाच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव झालेला होता असेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले होते. दिशाच्या शरीरावर म्हणजेच हाताला , पायाला आणि छातीजवळ जखमा असल्याचे म्हटले आहे.

दिशा सालीयनचे शवविच्छेदन ११ जून २०२० रोजी संध्याकाळी ४ वाजता करण्यात आले होते अशी वेळ नमूद करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

कोरटकर सापडला बातमी मात्र फरार !

उद्ध्वस्त होतील का २६७ शीश महल ???

उद्ध्वस्त होतील का २६७ शीश महल ???

जोकोविचने मुसेट्टीला पराभूत करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

अनेक फ्रॅक्चर झाल्याने दिशाचा मृत्यू झाला असल्याचे यात म्हटले आहे. डोळे, हात, पाय यांना जखमा झाल्याचा उल्लेख या रिपोर्टमध्ये आहे. ही बातमी समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली की त्यांनी अद्याप याची माहिती घेतलेली नाही तर उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले की, सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं.

दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला होता. तिनं आत्महत्या केली होती, असा पोलिसांनी दावा केला होता. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना या प्रकरणाने खळबळ उडवून दिली. अधिवेशन संपल्यावर या अहवालाची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version