नितीन देसाई यांच्या ११ ऑडिओ क्लिपमध्ये आहे काय? गुन्हा दाखल होणार

खालापूर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

नितीन देसाई यांच्या ११ ऑडिओ क्लिपमध्ये आहे काय? गुन्हा दाखल होणार

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्येनंतर मिळून आलेल्या ११ ऑडिओ क्लिप मध्ये एडलवाईस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी रसेश शहा यांच्यासह चार अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे, या सर्वांनी मानसिक त्रास दिल्याचे देसाई यांनी ऑडिओ क्लिप मध्ये म्हटले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

खालापूर पोलिसांकडून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यावर सर्वात प्रथम एडलवाईस कंपनीचे अधिकारी रसेश शहा यांचा जबाब नोंदवून त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

कोण आहे रसेश शाह?

रसेश शहा हे एडलवाईस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. मिरा रोड येथील फॉरेन्स करन्सी एक्सचेंज प्रकरणी ईडीकडून २०२० मध्ये त्यांची चौकशी करण्यात आली होती. मिरा रोडमधील एका कंपनीच्या घोटाळा प्रकरणात एडलवाईज ग्रुपच्या राशेश शाह यांचा ईडीने जबाब नोंदवण्यात आला होता. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात एडलवाईज कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नितीन देसाई यांनी ऑडिओ क्लिपमध्ये एडलवाईज कंपनीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात रसेश शाह यांचाही जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

पुणे विमानतळावर बॉम्ब आणल्याची धमकी

मुंबईत समुद्र किनाऱ्यावर आढळले दोघा भावांचे मृतदेह

इस्रायलचे ‘स्पाईक’ वाढवणार भारतीय वायूदलाची ताकद!

जम्मू काश्मीरचा बेपत्ता जवान अखेर सापडला

नेमकं प्रकरण काय?

२०१६ साली नितीन देसाईंच्या एनडीज आर्ट कंपनीने एडलवाईज कंपनीकडून १५० कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये पुन्हा एकदा ३५ कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज घेण्यात आले. २०२० पासून कोरोना आणि टाळेबंदीमुळे कंपनीचे कर्जाचे हप्ते थकण्यास सुरुवात झाली होती. ही थकबाकी एकूण २५२ कोटी रुपये इतकी होती. आर्थिक विवंचनेतून नितीन देसाई यांनी पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

Exit mobile version