25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाकाय घडले बिजापूरच्या गर्द जंगलात?

काय घडले बिजापूरच्या गर्द जंगलात?

Google News Follow

Related

छत्तीसगडमधील बिजापूरच्या जंगलात नक्षलवादी आणि सीआरपीएफच्या जवानांची चकमक झाली. यात नऊहून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवांना यश आलं असलं तरी या चकमकीत २२ जवान हुतात्मा झाले आहेत. २५० नक्षलवाद्यांशी सामना करताना जवानांनी पाच तास झुंज दिली. या ठिकाणी आता सर्च ऑपरेशन सुरू आहे.

नक्षलवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या २४ जवानांना बिजापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सात जवानांना रायपूरमध्ये नेण्यात आले आहे. सुरक्षा दलाने कोब्रा कमांडोच्या एका जवानाचा मृतदेह एअरलिफ्ट करून जगदलपूरला नेण्यात आला आहे.

माओवाद्यांच्या पीएलजीए बटालियन नंबर-१चं नेतृत्व कमांडर हिडमा करत होता. याच बटालियनने जवानांवर हल्ला केला. त्यात एकूण १८० नक्षलवादी होते. पामेड एरिया कमिटीचे नक्षलवादी पलटन, कोंटा एरिया कमिटी, जगरगुंडा आणि बासागुडा एरिया कमिटीचीही त्यांना साथ मिळाली होती. त्यामुळे या नक्षलवाद्यांची एकूण संख्या २५० झाली होती.

सुरक्षा दलाचे जवान मात्र दोन किलोमीटरच्या परिसरात घेरले गेले होते. तसेच सर्व जवान एकत्र नव्हते. ही चकमक सुमारे ५ ते ६ तास चालली. म्हणजे शनिवारी ४ वाजेपर्यंत सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली.

या हल्ल्यात ९ नक्षलवादी मारले गेले आणि १२ नक्षलवादी जखमी झाल्याचा सुरक्षा दलाचा दावा आहे.एका नक्षलवादी महिलेचा मृतदेहही सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चकमकीत नक्षलवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी या हल्ल्याविषयी ट्विट करत हुतात्मा झालेल्या जवानांना वंदन केलं आणि त्यांच्या शौर्याचा सत्कार केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखील जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

हे ही वाचा:

मुंबईत लॉकडाऊन लावण्याची शक्यता नाही- किशोरी पेडणेकर

नक्षली हल्ल्यात वीस जवान हुतात्मा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलावली उच्च स्तरीय बैठक

लसीकरणाला प्रोत्सहन देणारे अनोखे उपाय

या निर्घृण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आसाममधील प्रचार सोडून पुन्हा दिल्लीला आले आहेत. याशिवाय त्यांनी सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल कुलदीप सिंग यांना छत्तीसगडला तातडीने जायला सांगितले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल देखील आसामचा प्रचार थांबवत छत्तीसगडला परतले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा