25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामालोखंडवाला, मुर्गन चाळ हे अमलीपदार्थ तस्करांचे अड्डे!

लोखंडवाला, मुर्गन चाळ हे अमलीपदार्थ तस्करांचे अड्डे!

Google News Follow

Related

पश्चिम उपनगरांमधील वांद्रे, खार, सांताक्रूझ आणि अंधेरी- लोखंडवाला भागातील रहिवाशांनी या परिसरांमध्ये होणाऱ्या अमलीपदार्थांच्या तस्करीबद्दल आणि या वाढत्या प्रकरणांबद्दल नाराजी व्यक्त करत हेच गुन्हेगारीला चालना देत असल्याची तक्रार केली आहे. ‘पोलीस महासंचालक, स्थानिक पोलीस अशा सर्वांना संबंधित प्रकरणाबद्दल पत्र लिहिले आहे. गेल्या दीड वर्षांत अमलीपदार्थ तस्करीचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी पेरी रोड ते कार्टर रोड भागात खुलेआम अमलीपदार्थ विकले जात असतात. गुन्हे वाढण्यामागे हेच कारण आहे कारण गुन्हेगार अनेकदा हे अमलीपदार्थ सेवन करत असतात. अजूनपर्यंत पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही,’ असे वांद्रेच्या पेरी रोड रहिवासी संघाचे अध्यक्ष अनिल जोसेफ यांनी सांगितले.

वांद्रेची झोपडपट्टी, सांताक्रूझची मुर्गन चाळ, नर्गिस दत नगर, चॅपल रोड, कार्टर रोड, लोखंडवाला भागातील अमलीपदार्थ विक्रीमुळेच या भागातील गुन्हे वाढले असल्याचे रहिवासी संघांनी म्हटले आहे. वयस्कर व्यक्ती किंवा भिकारी रिक्षातून या भागात येतात आणि सहज रस्त्यांवरील लोकांना २०० ते ५०० रुपयांना अमलीपदार्थ विकत असतात. या संबंधीच्या तक्रारी नोंदवल्याचे आणि कारवाईची प्रतिक्षा करत असल्याचे अनिल जोसेफ यांनी सांगितले.

नुकतेच एका व्यसनाधीन व्यक्तीने भाभा रूग्णालयासमोरील पोलीस सह- आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बंगल्याजवळील गल्लीत अमलीपदार्थ संबंधित गोंधळ घातला होता. संबंधित प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार होणार सांगताच त्याने तक्रार करणाऱ्याला चुकीच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली होती. चॅपल रोड येथे राहणारे वकील अदनान मुखतिआर यांनी सांगितले की, अमलीपदार्थांची विक्री ही वांद्रे येथील झोपडपट्टी परिसरातून आणि रेल्वे ट्रॅकजवळ केली जाते. व्यसनी व्यक्ती त्यांची अमलीपदार्थांची गरज भागविण्यासाठी अगदी कचऱ्याचे डबे देखील चोरतात. प्रसंगी त्यांच्या विरोधात आवाज उठावणाऱ्यांवर ब्लेडने हल्ला करतात किंवा खोट्या गुन्ह्यांमध्ये नाव गोवण्याची धमकीही देतात.

हे ही वाचा:

शाहरुखपुत्र आर्यन खान क्रूझवर होता हे ‘कन्फर्म’; आठ जणांना घेतले ताब्यात

अफगाणिस्तान सीमेवर आत्मघातकी हल्लेखोर तैनात

शाहरुख खानचा मुलगा क्रूझ छापाप्रकरणी ताब्यात?

दर १५ दिवसांनी आरटीपीसीआर करण्याच्या नियमामुळे शिक्षक वैतागले

सांताक्रूझमधील मुर्गन चाळ ही एक अत्यंत धोकादायक जागा असून इथून अमलीपदार्थ संबंधित अनेक रॅकेट्स चालवले जातात. या चाळीमध्ये फार कमी लोक जाऊ शकतात आणि स्थानिकांचे आयुष्य त्यांनी बरबाद केले आहे. पोलीस सह- आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांताक्रूझ पोलिसांना वेळोवेळी या परिसरात धाडी टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे खार रहिवासी संघाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आनंदिनी ठाकूर यांनी सांगितले.

पश्चिम उपनगरांमधील अमलीपदार्थ तस्करीचा अजून एक महत्त्वाचा अड्डा म्हणजे लोखंडवाला. फेब्रुवारी ते मे या महिन्यांमध्ये एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये ५१ गुन्हे दाखल करण्यात आले होते तर १०० अमलीपदार्थ विक्रेते आणि पुरवठादारांना अटक करण्यात आली होती. त्यातील ७० विक्रेते हे पश्चिम उपनगरांमधील होते आणि त्यातीलही अर्धे लोखंडवाला परिसरातील होते. ५१ प्रकरणांपैकी १७ प्रकरणे लोखंडवालामधील असल्याचे एनसीबीचे संचालक समीर लोखंडे यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा