पश्चिम बंगालचे वनमंत्री ज्योतीप्रिय मलिक यांना अटक

ईडीने केली कारवाई

पश्चिम बंगालचे वनमंत्री ज्योतीप्रिय मलिक यांना अटक

पश्चिम बंगालचे वनमंत्री ज्योतीप्रिय मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने अटक केली आहे. तब्बल २० तास चाललेल्या सर्च ऑपरेशननंतर ईडीने वनमंत्री ज्योतीप्रिय मलिक यांना शुक्रवार, २७ ऑक्टोबर रोजी पहाटे अटक केली. रेशन घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीने ज्योतीप्रिय मलिक यांच्या घरासह सात ठिकाणी गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी सकाळपासून शोध मोहिम राबवली होती. त्यानंतर शुक्रवारी, पहाटे ४ वाजता त्यांना अटक करण्यात आली. वन मंत्रालयापूर्वी मलिक यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा कार्यभार होता.

माहितीनुसार, उद्योगपती बाकीबुर रहमानच्या अटकेनंतर केंद्रीय तपास यंत्रणेने मलिक यांच्या घरावर छापा टाकला होता. ईडीने कैखली येथील त्यांच्या फ्लॅटवर ५३ तास चाललेल्या छाप्यानंतर रेहमानला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. रेहमानच्या फ्लॅटमध्ये सरकारी कार्यालयांचे शिक्के असलेली १०० हून अधिक कागदपत्रे सापडली आहेत.

हे ही वाचा.. 

माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष

वडाळ्यात सापडला महिलेचा तुकडे केलेला मृतदेह

मृत्युदंडाच्या शिक्षेपासून आठ भारतीय वाचू शकतील का?

राईस मिलच्या व्यवसायाव्यतिरिक्त रहमानकडे अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि बार आहेत. ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, रहमानच्या कंपन्यांमध्ये ५० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली होती. कोविड- १९ लॉकडाऊन दरम्यान राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अनेक अनियमितता आणि रेशन वितरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावेळी मलिक अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री होते.

Exit mobile version