पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याच्या घरावर बॉम्बहल्ला आणि गोळीबार!

पोलिसांवर मूक प्रेक्षक असल्याचा आरोप

पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याच्या घरावर बॉम्बहल्ला आणि गोळीबार!

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राजकीय पक्षांशी संबंधित लोकांना टार्गेट केले जात असल्याचे दिसत आहे. काल (२६ मार्च) रात्री उत्तर २४ परगणा येथे भाजप नेते अर्जुन सिंह यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्या घराबाहेर बराच गोंधळ घातला. यावेळी हल्लेखोरांकडून भाजपा नेत्याच्या घरावर कच्चे बॉम्ब फेकण्यात आले आणि गोळीबारही झाला. हल्ल्यावेळी पोलीस बघ्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप अर्जुन सिंह यांनी केला आहे. या घटनेनंतर अर्जुन सिंह यांच्या घरी अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

भाजप नेते आणि माजी खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात एक तरुण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा नेते सिंग आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी हल्लेखोरांचा पाठलाग केल्याचे वृत्त आहे. मात्र, हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. बराकपूरचे पोलिस आयुक्त अजय ठाकूर म्हणाले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. यामध्ये सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसच्या नगरसेवक सुनीता सिंग यांचा मुलगा नमित सिंग असल्याचा आरोप अर्जुन सिंह यांनी केला. माजी खासदाराने दावा केला की, ‘त्याने पोलिसांसमोर गोळीबार केला. अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्बस्फोट झाले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा :
नाशिकमध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचे १८१ ‘बांगलादेशी’ लाभार्थी; एफआयआर दाखल
अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वाहनांवर २५ टक्के कर; कोणत्या भारतीय कंपन्यांवर होणार परिणाम?
कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी!
चेंबूर, गोवंडीमधून १७ बांगलादेशी घुसखोरांना अटक
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

फाजिलपणा हेच पक्षकार्य ? | Mahesh Vichare | Anil Parab | Uddhav Thackeray | Sushma Andhare |

Exit mobile version