राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चौथ येथून उज्जैनला जात असताना एका वऱ्हाडाचा नदीत पडून अपघात झाला असून या अपघातात नवरदेवासह नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले, मात्र कोणालाही वाचवता आले नाही.
चौथसाठी बारवारा ते उज्जैनला वऱ्हाड निघाले होते. कारमध्ये नवरदेवासह नऊ जण होते. यासोबतच मागून एक वऱ्हाडाने भरलेली बसही होती. त्या बसने ओव्हरटेक केले आणि बस पुढे निघून गेली. यादरम्यान कार नयापुरा चंबळ नदीच्या छोट्या पुलावरून जात होती आणि अचानक ड्राइवरचा ताबा सुटला आणि वऱ्हाड थेट चंबळ नदीत पडले.
Rajasthan | Eight people died after their car fell off Chhoti Puliya and into the Chambal river in Kota. The occupants of the car were going to a wedding. The car was retrieved with the help of a crane. pic.twitter.com/TYjWlioP2q
— ANI (@ANI) February 20, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश नावाच्या नवरदेवासह ही गाडी उज्जैनला जात होती. ज्यामध्ये चौथ का बरवाडा आणि जयपूरचे काही लोक सहभागी होते. पोलीस मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघाताची माहिती ऐकून तेथील स्थानिक लोकही तात्काळ कारमधील प्रवाशांच्या मदतीला धावून आले.
अपघाताची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला आहे. यासोबतच कोटा दौऱ्यावर असलेल्या UDH मंत्री शांती धारीवाल यांनीही शोक व्यक्त केला आहे आणि प्रशासनाला अपघातात तातडीने मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हे ही वाचा:
नवी मुंबईतील बार प्रकरणी समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल
कवठेमहांकाळची निवडणूक बनावट मतदारांमुळे वादात
‘महाराष्ट्राच्या जनतेला सत्य काय आहे ते समजले पाहिजे’
‘मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल कॅग ऑडिट करण्याची गरज’
तसेच मृतांच्या आश्रितांनी मदतीची मागणी केली आहे. ज्यांचा मृत्यू झाला आहे ते गरीब कुटुंबातील असून त्यांच्या अंत्यसंस्कारात खूप त्रास होणार असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. भेट दिलेल्या जिल्हाधिकारी हरिमोहन मीना, आयजी रविदत्त गौर यांच्याकडे नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.