उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर पोलिसांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे पत्र मिळाले. धमकीचे पत्र लिहिणाऱ्याने स्वतःला आयएसआय एजंट म्हणून वर्णन केले. कुख्यात अतिक अहमद आणि मुख्तार अन्सारी याच्या एन्काउंटरचा बदला घेण्याबद्दलचाही पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री योगी यांची १० एप्रिल रोजी हत्या केली जाईल, असे आरोपीने पत्रात म्हटले होते. यामध्ये पत्र पाठवणाऱ्यांची नावे आबिद अन्सारी, नफीस अन्सारी अशी होती. धमकी देणाऱ्याने सांगितले की त्यांना पाकिस्तानकडून प्रशिक्षण मिळाले आहे. पत्र वाचल्यानंतर पोलिसांनी त्वरित तपासला सुरुवात केली. मात्र, तपासादरम्यान समोर आलेली माहिती पाहून पोलसांना धक्काच बसला.
जमिनीच्या वादावरून आरोपी अझीमने त्याच्या दोन्ही भावांविरुद्ध कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. सीसीटीव्ही आणि निगरानीच्या मदतीने पोलिसांनी जलालाबाद पोलिस ठाण्याच्या गुनारा गावातील रहिवासी असलेल्या आरोपी अझीमला अटक केली.
हे ही वाचा :
युनूस यांच्या सत्तेची लालसा बांगलादेशला जाळतेय!
उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा ७ वर्षांचा मुलगा आगीच्या कचाट्यात!
बांगलादेशाची अफगाणिस्तानच्या दिशेने वाटचाल? KFC, Pizza Hut, Bata वर जबर हल्ले
बुंदेलखंडच्या राय लोकनृत्याला जागतिक ओळख देणारे पद्मश्री राम सहाय पांडे यांचे निधन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अझीम आणि आबिद अन्सारी यांच्यात जमिनीवरून वाद सुरू आहे. या कारणामुळे आरोपीने त्याचा भाऊ आबिद आणि नफीस अन्सारी यांना अडकवण्यासाठी के कृत्य केले. धमकी प्रकरणात दोघेही भाऊ तुरुंगात गेल्यानंतर सर्व जमीन आपल्या नावावर करण्याचा त्याचा इरादा होता. या प्रकरणी आरोपी अझीमला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
शाहजहांपुर के SP ऑफिस में चिट्ठी भेजकर CM योगी को मारने की धमकी दी गई। चिट्ठी भेजने वालों का नाम आबिद अंसारी, नफीस अंसारी लिखा था।
पुलिस ने अजीम को अरेस्ट किया। अजीम चाहता था कि ये दोनों भाई जेल चले जाएं तो मैं इनकी जमीन कब्जा लूं। इसलिए उसने दोनों भाइयों का नाम लिख दिया। pic.twitter.com/eB96OUTLsV
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) April 8, 2025