किराणा मालाच्या दुकानात ड्रग्जची विक्री होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जीवनावश्यक वस्तू ज्या दुकानात ग्राहकांना मिळत असतात तेथेचं ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती समोर येताच खळबळ उडाली आहे. किरणा दुकानातून ४ कोटी ५० लाख ७० हजार रुपयांचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी राजेशकुमार प्रेमचंद तिवारी याला अटक केली आहे. सध्या तिवारी याला ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उल्हासनगर ग्रामीण भागामधील नेवाळी नाक्यावर राजेशकुमार तिवारी याचे किराणा दुकान आहे. त्याच्या दुकानात एमडी ड्रग्सचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दुकानावर छापा टाकून त्याच्याकडून तब्बल ४ कोटी ५० लाख ७० हजार रुपयांचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी राजेशकुमार प्रेमचंद तिवारी याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला किराणा दुकानात ड्रग्सची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी दुपारी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उल्हासनगरातील ग्रामीण भागामधील नेवाळी नाक्यावरील किराणा दुकानावर छापा टाकला. दुकानाची झाडाझडती घेतली असता किराणा दुकानदार राजेशकुमार तिवारी घाबरला. त्याच्या दुकानात ३ किलो ६ ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर मिळून आली. या ड्रग्सची किंमत बाजारात ४ कोटी ५० लाख ७० हजार आहे.
हे ही वाचा:
सलमान खान हल्ला प्रकरणी आरोपीच्या आत्महत्येबाबत कुटूंबीय न्यायालयात
‘काँग्रेसला औरंगजेबाचा जिझिया कर लागू करायचा आहे’
पाकिस्तानी मच्छिमारांसाठी भारतीय नौदल बनले देवदूत!
वडेट्टीवारांची कसाबला क्लीनचीट, निकम मात्र देशद्रोही
तिवारीला हा ड्रग्सचा साठा शैलेश राकेश अहिरवार याने पुरवला असल्याची माहिती आहे. त्याच्याकडून मिळालेल्या ड्रग्जची तिवारी बेकायदेशीररित्या विक्री करत होता. याप्रकरणी दुकानदार राजेशकुमार तिवारी याला अटक करण्यात आली आहे. शैलेश अहिरराव याचा तपास सुरू आहे.