वक्फ बोर्ड म्हणते औसामधील १७५ एकर जमीन आमची! तळेगावनंतर नवा दावा

शेतकरी संतापले, २५ जणांना नोटीस

वक्फ बोर्ड म्हणते औसामधील १७५ एकर जमीन आमची! तळेगावनंतर नवा दावा

वक्फ बोर्डाकडून लातूर जिल्ह्यातील तळेगावनंतर आता औसा तालुक्यातील १७५ एकर जमिनीवर दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. लातूर जिल्ह्यातील तळेगाव नंतर आता औसा तालुक्यातील बुधोडा येथील २५ शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकरणाची नोटीस आली आहे. त्यानुसार, १७५ एकर जमिनीवर वक्फ बोर्डाकडून दावा करण्यात आला आहे.

अलीकडेच तळेगावातील शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकरणाकडून नोटीस आल्याचे प्रकरण ताजे असताना आणखी एका गावात हाच प्रकार समोर आला आहे. लातूरच्या औसा तालुक्यातील बुधोडा गावातील २५ शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्यूनलकडून नोटिसा मिळाल्या आहेत. गावातील जवळपास १७५ एकर जमिनीवर दावा सांगण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे राहणाऱ्या समशाद अझगर हुसैन यांनी वक्फ न्यायाधिकरणाकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीवरून वक्फ ट्रिब्यूनलने बुधोडा गावातील शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

गावातील शेतकरी राजेश बुधोडकर यांनी सांगितले की, आम्हाला ही नोटीस तारीख निघून गेल्यानंतर आली. पुढची तारीख २८ डिसेंबर दिली आहे. तसेच आम्ही २५ शेतकऱ्यांनी मिळून एक वकील नेमला आहे. विनाकारण त्रास देण्याचं काम सुरू आहे. आमची चौथी पिढी शेतात राबतेय आणि आज अचानक दावा ठोकला जातोय.

हे ही वाचा :

एनआयएने अमरावतीमधून ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या डायरीमधून सापडले पाकिस्तानी नंबर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला उडवून देण्याची धमकी; रशियन भाषेत आला मेल

दिल्लीतील शाळांना धमकीसत्र सुरूचं; सहा शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी देश एकजुटीने उभा

तळेगावमधील सर्वजण शेतीवर अवलंबून आहेत. मात्र, या गावातील ७५ टक्के जमिनीवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. गावातील १०३ शेतकऱ्यांच्या ३०० एकर जमिनीचा यात समावेश आहे. दरम्यान, तळेगावच्या शेतकऱ्यांना पाठविण्यात आलेल्या नोटीसशी वक्फ बोर्डाचा कुठलाही संबंध नसल्याचे वक्फ बोर्डाने स्पष्ट केले आहे. यावर आता २० डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. राज्यातील वक्फ बोर्डचे अध्यक्ष समीर काजी यांच्या माहितीनुसार तळेगाव येथील शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीस या एका व्यक्तीने कोर्टात दावा दाखल केल्यानंतर कोर्टाने काढल्या आहेत.

Exit mobile version