जैसलमेरमध्ये वक्फ बोर्डाचे अतिक्रमण हटवले

जैसलमेर नगरपरिषदेने केली कारवाई

जैसलमेरमध्ये वक्फ बोर्डाचे अतिक्रमण हटवले

राजस्थानमध्ये जैसलमेर नगरपरिषदेने बुधवारी मोठी कारवाई करत वक्फ बोर्डाचे अतिक्रमण हटवले. बारमेर रोडवर असलेल्या वक्फ बोर्डाचे अतिक्रमण नगरपरिषद आयुक्त लजपालसिंग सोढा यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाच्या उपस्थितीत हटवण्यात आले. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे वक्फ बोर्डाचे अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

वक्फ बोर्डाच्या खसरा क्रमांक ४७८ वर नगर परिषदेने कारवाई केली आहे. वक्फ बोर्डाला १८ बिघा (साधारण ११ एकर) जमीन देण्यात आली होती. मात्र, वक्फ बोर्डाने ४७ बिघा (साधारण २९ एकर) जागेवर अतिक्रमण केले. त्यामुळे नगर परिषदेने २९ बिघा (साधारण १८ एकर) जमीन अतिक्रमणमुक्त केली आहे. दरम्यान, मुस्लीम समाजातील लोकांनी वक्फ बोर्डाची जागा आणि कब्रस्तान अतिक्रमण असल्याचे सांगत नगर परिषदेच्या कारवाईचा निषेध केला.

हे ही वाचा :

रतन टाटांच्या निधनानंतर उद्योग क्षेत्रात शोककळा; भारतासाठी दुःखद दिवस असल्याच्या भावना

‘लाडली बहना योजने’विषयीचे वक्तव्य भोवले; संजय राऊतांवर गुन्हा दाखल

देशाने एक अनमोल ‘रतन’ गमावलं!

उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा

माजी प्रमुख अमरदीन फकीर यांनी घटनास्थळ गाठून नगरपरिषद आयुक्त आणि सीआय यांची भेट घेऊन योग्य कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाने जेसीबी चालवून अतिक्रमण हटवले, यामुळे या कारवाईवर मुस्लिम समाजाने टीका केली आहे. नगर परिषदेकडून चुकीची कारवाई होत असल्याचा आरोप माजी प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष करत आहेत. तर, स्थानिकांनी मात्र या कारवाईचे कौतुक केले आहे.

Exit mobile version