27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामासोशल मीडियाच्या व्यसनापायी १६ वर्षीय मुलाने गमावला जीव

सोशल मीडियाच्या व्यसनापायी १६ वर्षीय मुलाने गमावला जीव

Google News Follow

Related

इंदौर मध्ये एका मुलाला सोशल मीडियाचं व्यसन जीवावर बेतले. मुलाने इंस्टग्रामवर गळफास घेण्याच रील बनवत असताना त्याला चुकून गळफास लागला आहे.

इंस्टाग्रामवर रील बनवताना आदित्य (१६) याला चुकून गळफास लागल्याची घटना घडली. या प्रकरणाचा इंदूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पीडितेच्या मित्रांनी पोलिसांना पुष्टी केली की, आदित्य एक बनावट व्हिडिओ शूट करत होता. परंतु त्याच्या फोनमध्ये अशी कोणतीही क्लिप आढळली नाही.

न्यूज १८ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात असे समोर आले आहे की, पीडित मुलगा इयत्ता दहावीत शिकत होता. त्याला सोशल मीडियाचे व्यसन होते. व्यसनाधीनतेमुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला यापूर्वी असे सर्व ऍप्स डिलीट करायला लावले होते. पण गेल्या आठवड्यात त्याचे आई-वडील रतलाम येथे एका लग्नला गेले होते. आदित्यने या संधीचा फायदा साधून, त्याने आपल्या मित्रांना घरी बोलावले आणि एक बनावट फाशीचा सीन शूट करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांकडून असे सांगण्यात आले आहे की, आदित्य रिल शूट करण्यासाठी खुर्चीवर चढला आणि त्याने गळ्यात फास घातला परंतु चुकून खुर्चीवरून तो घसरला त्यामुळे दोर घट्ट झाला आणि त्याचा मृत्यू झाला. घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला. दुपारी जेव्हा आदित्यचा भाऊ राजदीप घरी परतल्यावर ही बाब समोर आली. त्यांनी शेजाऱ्यांना गोळा करून भावाला खासगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी आदित्यचा फोन तपासासाठी ताब्यात घेतला असून चौकशी सुरू केली आहे.

हे ही वाचा:

मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील ३८ इमारती भोगवटा प्रमाणपत्राविना!

ठाकरे सरकारला दणका; देशमुख प्रकरणात सीबीआय करणार चौकशी

सुनील गावस्करांनी राजदीप सरदेसाईला दाखविली त्याची जागा

दिवसाला बँक फसवणुकीच्या २२९ घटना

 

या वर्षाच्या सुरुवातीलाही असाच एक प्रकार घडला होता. इरफान खान म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका इंस्टग्राम प्रभावकर्त्याला मुंबईत त्याच्या मृत्यूची ऑनलाइन बनावट केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. वृत्तानुसार, खानने स्वतःचा एक व्हिडिओ शूट केला ज्यामध्ये तो रेल्वे रुळांवर बसलेला दिसत होता. आणि त्याला ट्रेनने धडकल्याचा व्हिडीओ त्याने एडिट केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा